नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी शोधत आहे. मात्र वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं क्रिकेटमधून ब्रेक घेतला. आता धोनी थेट 29 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिसेल. मात्र याआधी धोनी एका खास सामन्यात दिसेल असे चाहत्यांना वाटत होते. मात्र आता चाहत्यांच्या आशा मावळल्यात आहे. कारण बीसीसीआयच्या वतीनं या खास सामन्यासाठी धोनीची निवड करण्यास आलेली नाही. बांगलादेशमध्ये 18 ते 21 मार्च दरम्यान दोन टी-20 सामने खेळले जाणार आहे. हे सामने बांगलादेशच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शेख मुजीबउर रेहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. या सामन्यांसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे 4 भारतीय खेळाडूंची मागणी केली होती. त्यानुसार चार खेळाडूंनी निवड बीसीसीआयने केली आहे. मुख्य म्हणजे यात धोनीच्या नावाचा समावेश नाही आहे. Asia XI vs World XI या स्पर्धेसाठी बीसीसीआयनं निवडलेल्या भारताच्या 4 खेळांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या चार भारतीय खेळाडूंचं नाव पाठवलं आहे. वाचा- हैदराबादकडून IPL खेळणाऱ्या ‘या’ स्टार क्रिकेटपटूला हवे पाकिस्तानचे नागरिकत्व? याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डानं धोनीला पाठवण्याची मागणी केली होती. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी धोनीच्या नावाचा समावेश केला नाही आहे. IANS वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गांगुलीनं या चार खेळाडूंची नावे जवळजवळ निश्चित केली आहेत. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान या सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडू सहभागी होणार नाहीयेत. केवळ याच अटीवर भारतीय खेळाडू स्पर्धेत खेळतील अशी अट बीसीसीआयने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला घातली होती. वाचा- विराटसाठी धोक्याची घंटा! 91 दिवस, 19 डावांआधी लगावले होते शतक याआधी बीसीसीआयनं धोनीला खेळाडूंच्या वार्षिक करारातून वगळले होते. त्यामुळं बीसीसीआय धोनीला निवृत्ती घेण्यास भाग तर पाडत नाही आहे ना? असा सवाल विचारला जात आहे. वाचा- एकदाही जिंकले नाही IPL! पण 12 वर्षात ‘या’ विक्रमावर फक्त RCBचा दबदबा 8 महिन्यांनंतर धोनी करणार कमबॅक धोनीनं जुलै 2019नंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. मात्र आता धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण धोनीच्या पुनरागमनाची तारीख जाहीर झाली आहे. धोनी आता वर्ल्ड कप 2019नंतर थेट आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी 29 मार्च रोजी 8 वाजता वानखेडे मैदानावर सामना होईल.याआधी धोनी कोणता सामना खेळेले याची शक्यता कमी आहे. धोनीनं अखेरचा सामना 10 जुलै 2019मध्ये खेळला होता. आता 8 महिन्यांनंतर 29 मार्च 2020 रोजी धोनी मैदानात उतरेल. दरम्यान धोनीचे टीम इंडियात कमबॅक हे त्याच्या आयपीएलमधील फॉर्मवर अवलंबून असेल. आयपीएलनंतर भारत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे तयारी करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







