Home /News /sport /

हैदराबादकडून IPL खेळणाऱ्या ‘या’ स्टार क्रिकेटपटूला हवे पाकिस्तानचे नागरिकत्व?

हैदराबादकडून IPL खेळणाऱ्या ‘या’ स्टार क्रिकेटपटूला हवे पाकिस्तानचे नागरिकत्व?

दोन वर्ल्ड कप जिंकलेल्या चॅम्पियन खेळाडूनं केला पाकिस्तानच्या नागरिकत्वासाठी अर्ज.

    कराची, 22 फेब्रुवारी : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि कॅरेबियन संघाला दोन टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधाराला पाकिस्तानचे नागरिकत्व हवे आहे. दिग्गज अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमी पाकिस्तानचे नागरिकत्व मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी सॅमीनं अर्जही केला आहे. सॅमी सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जाल्मी संघाचा कर्णधार असून IPLमध्ये सॅमी सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. पाकिस्तानमध्ये गेल्यास सॅमीला आयपीएल खेळता येणार नाही. पाकिस्तान सुपर लीगचे (PSL) पाचवे हंगाम खेळले जात आहे., दुसर्‍या आवृत्तीचा अंतिम सामना पाकिस्तानमध्ये खेळला गेला. त्यावेळी डॅरेन सॅमीने पीएसएल टीम पेशावर जल्मीचे नेतृत्व केले आणि संघाला जेतेपद मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॅरेन सॅमीपूर्वी कोणतेही परदेशी खेळाडू पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास तयार नव्हते, परंतु सॅमी तिथे जाऊन क्रिकेट खेळला. 2009मध्ये श्रीलंकेच्या टीम बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट थांबविण्यात आले होते. वाचा-एकदाही जिंकले नाही IPL! पण 12 वर्षात ‘या’ विक्रमावर फक्त RCBचा दबदबा टीम मलिकने केला खुलासा पाकिस्तानी माध्यमांनुसार पेशावर झल्मी संघाचे मालक जावेद आफ्रिदी म्हणाले आहेत की, "डॅरेन सॅमी हा त्याच्या संघाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याने पाकिस्तानच्या नागरिकतेसाठी अर्ज केला आहे." अगदी स्वतः जावेद आफ्रिदी यांनीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला डेरेन सॅमीला नागरिकत्वाच्या बाबतीत मदत करण्याची विनंती केली आहे”. सॅमी वेस्ट इंडिजचा महत्त्वाचा खेळाडू असून, त्यांना दोन टी-20 वर्ल्ड कप मिळवून देण्यात त्याचे मोलाचे योगदान होते. वाचा-'तुम एक हसीन हो लाखों में', विंडिजच्या 83 वर्षांच्या क्रिकेटपटूने केला डान्स पहिल्यांदाच पाकमध्ये खेळणार सॅमी पाकिस्तान सुपर लीगचा संपूर्ण हंगाम (पीएसएल) यावेळी पाकिस्तानमध्ये खेळला जात आहे. यापूर्वी पाकिस्तानमध्ये काही सामने झाले होते. दुसरीकडे, वेस्ट इंडीज संघाला 2014 आणि 2018 मध्ये दोन टी -20 विश्वविजेते बनविणारा कर्णधार डॅरेन सॅमी पीएसएलसाठी प्रथमच पाकिस्तानला पोहोचला. याबद्दल डॅरेन सॅमी म्हणाला की, "मला पाकिस्तानमध्ये येण्याची आवड होती. 2017मध्ये मी पीएसएल फायनलसाठी अंतिम सामना खेळण्यासाठी येथे आलो होतो. यावेळीच्या पीएसएलबद्दल मी उत्साहित आहे. प्रत्येक देशातील क्रिकेट चाहते त्यांच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय सामने पाहतात. वांट आणि पाकिस्तानी चाहते अनेक वर्षांपासून यापासून वंचित आहेत". सॅमी सध्या आंतरराष्ट्रीय सामने कमी आणि टी-20 लीग जास्त खेळत आहे. वाचा-वडिलांनी क्रिकेट खेळू दिलं नाही म्हणून गेली पळून आणि...
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या