वेलिंग्टन, 22 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना होत आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी सुमार दर्जाची कामगिरी केली. परिणामी प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 165 धावांत आटपला. यात रहाणेनं सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. दरम्यान या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला केवळ 2 धावा काढता आल्या. त्यामुळं विराटचा फॉर्म हा भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहे. विराटनं 19 डावांत (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20) एकही शतक लगावलेले नाही. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या डावात विराटनं केवळ 7 चेंडूंचा सामना केला आणि तो बाद झाला. विराटनं अखेरचे शतक बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबरमध्ये लगावले होते. म्हणजे तब्बल 91 दिवस झाल्यानंतरही त्याने शतक लगावलेले नाही. सध्याच्या न्यूझीलंड दौर्यात भारतीय कर्णधाराने 7 डावात (एकदिवसीय आणि टी-20) केवळ एका अर्धशतकासह 180 धावा केल्या. टी -20 च्या 4 सामन्यांमध्ये त्याने 125 धावा आणि 3 एकदिवसीय सामन्यात 75 धावा केल्या. कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंजत असल्याचे हे प्रथमच नाही. यापूर्वी, फेब्रुवारी 2014 ते ऑक्टोबर 2014 या काळात तिन्ही फॉर्मेटमध्ये 25 डावांनंतर एकही शतक लगावले नाही. यात इंग्लंड दौर्याचाही समावेश आहे. ज्यामध्ये तो 5 कसोटी सामन्यात केवळ 134 धावा करू शकला. वाचा- विराटला झालंय काय? पहिल्याच कसोटी सामन्यात केला लाजीरवाणा रेकॉर्ड न्यूझीलंडविरुद्ध लाजीरवाणा विक्रम विराट कोहलीनं निराशाजनक कामगिरी केली असली, तरी असं करणारा तो पहिला कर्णधार नाही आहे. याआधी माजी कर्णधार सौरव गांगुली आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात केवळ 2 धावा करत बाद झाला. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात याआधी कर्णधार म्हणून नवाब पटौडी यांनी 11, सुनील गावस्कर नाबाद 35, बिशन सिंग बेदी 30 धावा, मोहम्मद अझहरुद्दीन 30 आणि विरेंद्र सेहवाग 22 धावा केल्या आहेत. वाचा- ‘कोहलीला 20 कोटी मिळतात म्हणून चांगला खेळतो नाहीतर…’ कोहली 2011मध्ये 24 डावांत एकही शतक लगावले नव्हते कोहलीचा खराब फॉर्म फेब्रुवारी 2011पासून डिसेंबर 2011 खराब फॉर्ममध्ये होता. त्यावेळी 24 डावांत कोहलीने एकही शतक लगावले नव्हते. कोहलीनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 70 शतक लगावले आहेत. यात 84 कसोटी सामन्यात 27 आणि 248 एकदिवसीय सामन्यात 43 शतक लगावले आहेत. वाचा- विराटला आऊट करण्यासाठी टेलरने हाताने नाही तर पोटाने घेतला कॅच? पाहा मजेशीर VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







