• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • न्यूझीलंडनंतर आणखी एक टीम पाकिस्तानला धक्का द्यायच्या तयारीत, फायदा IPL चा होणार!

न्यूझीलंडनंतर आणखी एक टीम पाकिस्तानला धक्का द्यायच्या तयारीत, फायदा IPL चा होणार!

न्यूझीलंडच्या टीमने अखेरच्या क्षणी पाकिस्तान दौऱ्यातून (New Zealand Pulled Out of Pakistan Tour) माघार घेतली. न्यूझीलंडच्या टीमने घेतलेल्या या निर्णयानंतर आता आणखी एक टीम पाकिस्तानला धक्का द्यायच्या तयारीत आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 सप्टेंबर : न्यूझीलंडच्या टीमने अखेरच्या क्षणी पाकिस्तान दौऱ्यातून (New Zealand Pulled Out of Pakistan Tour) माघार घेतली. पहिल्या वनडेचा टॉस पडण्याच्या आधीच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) सुरक्षेचं कारण देऊन सीरिज न खेळण्याचा निर्णय घेतला. या दौऱ्यात न्यूझीलंडची टीम 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज खेळण्यासाठी गेली होती. न्यूझीलंडने अखेरच्या क्षणी माघार घेतल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PCB) मात्र चांगलाच तीळपापड झाला आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड न्यूझीलंडविरुद्ध आयसीसीकडेही तक्रार करणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची सीरिज वाचवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आटोकाट प्रयत्न केले. एवढच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशीही चर्चा केली, पण याचा काहीही फायदा झाला नाही. इम्रान खान हात-पाय पडले, तरी न्यूझीलंडच्या पंतप्रधान ऐकल्या नाहीत! न्यूझीलंडच्या टीमने घेतलेल्या या निर्णयानंतर आता आणखी एक टीम पाकिस्तानला धक्का द्यायच्या तयारीत आहे. इंग्लंडची टीमही पाकिस्तानमधल्या (England tour of Pakistan) परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतचं वक्तव्य केलं आहे. 'न्यूझीलंडच्या टीमने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आमच्या सुरक्षा यंत्रणा ज्या पाकिस्तानमध्ये आहेत, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करत आहोत. पुढच्या 24-48 तासांमध्ये आम्ही पाकिस्तानला जायचं का नाही, याबाबतचा निर्णय घेऊ,' असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. भारत-इंग्लंडनंतर आणखी एक वाद ICC च्या कोर्टात, पाकिस्तानची न्यूझीलंडविरुद्ध तक्रार 13 आणि 14 ऑक्टोबरला इंग्लंडची टीम पाकिस्तानमध्ये दोन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. यानंतर दोन्ही टीम वर्ल्ड कपसाठी युएईला रवाना होणार आहेत. आता इंग्लंडनेही पाकिस्तान दौरा रद्द केला तर याचा फायदा आयपीएल टीमना होऊ शकतो. पाकिस्तान दौऱ्यासाठी आयपीएलच्या प्ले-ऑफमधून (IPL 2021 Play Offs)  इंग्लंडचे खेळाडू माघार घेऊ शकतात, असं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि चेन्नई सुपरकिंग्सचे (CSK) मोईन अली (Moeen Ali) आणि सॅम करन (Sam Curran) यांना पाकिस्तान दौऱ्यामुळे आयपीएलचा अखेरचा टप्पा मुकायला लागण्याची शक्यता आहे. पण इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जर पाकिस्तान दौराच रद्द केला, तर या खेळाडूंचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा होईल. क्राईस्टचर्च गोळीबार विसरलात का? न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्यावर पाकिस्तानचा संताप
  Published by:Shreyas
  First published: