मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

PAK vs NZ : इम्रान खान हात-पाय पडले, तरी न्यूझीलंडच्या पंतप्रधान ऐकल्या नाहीत!

PAK vs NZ : इम्रान खान हात-पाय पडले, तरी न्यूझीलंडच्या पंतप्रधान ऐकल्या नाहीत!

न्यूझीलंड क्रिकेट टीमने पहिल्या वनडेच्या काही मिनिटं आधी आपण पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेत (New Zealand Called off Pakistan Tour) असल्याचं सांगितलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आरडेर्न (New Zealand PM Jacinda Ardern) यांच्याशीही चर्चा केली, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 17 सप्टेंबर : न्यूझीलंड क्रिकेट टीमने पहिल्या वनडेच्या काही मिनिटं आधी आपण पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेत (New Zealand Called off Pakistan Tour) असल्याचं सांगितलं. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या (NZC) या भूमिकेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) चांगलाच धक्का बसला. 18 वर्षांनी न्यूझीलंडची टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती, त्यावेळीही बॉम्बस्फोट झाल्यामुळे न्यूझीलंडच्या टीमने पाकिस्तान दौरा अर्धवट सोडला होता. यावेळीही न्यूझीलंडच्या टीमने सुरक्षेचं कारण देऊन पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली.

न्यूझीलंडची टीम पाकिस्तान दौऱ्यात रावळपिंडीमध्ये 3 वनडे आणि लाहोरमध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार होती, पण आता हा दौराच रद्द करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धची सीरिज वाचवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रयत्न केले. एवढच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आरडेर्न (New Zealand PM Jacinda Ardern) यांच्याशीही चर्चा केली, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी सीरिजचं आयोजन करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसोबत चर्चाही केली. 'आम्ही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाशी बोललो, एवढच नाही तर पंतप्रधान इम्रान खान यांनीही न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसोबत बातचित केली. आमच्याकडे जगातली सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा आहे. न्यूझीलंडच्या टीमला कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेचा धोका नाही, असं इम्रान खान यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना सांगितलं,' असं पीसीबीने त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणलं.

तालिबानशी हातमिळवणी करणाऱ्या पाकिस्तानची जगात नाचक्की, न्यूझीलंडनं टॉसपूर्वी केला दौरा रद्द

न्यूझीलंडविरुद्धची सीरिज रद्द झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा (PCB Chairman Rameez Raja) यांनी संताप व्यक्त केला आहे. 'एक खराब दिवस. प्रशंसक आणि खेळाडू खूप दु:खी आहेत. सुरक्षा आणि धोक्याबाबत एक तर्फी भूमिका घेऊन दौऱ्याबाहेर जाणं निराशाजनक आहे. खासकरून जेव्हा ही गोष्ट न सांगता केली जाते. न्यूझीलंड कोणत्या दुनियेत जगत आहे? आता ते आमचं म्हणणं आयसीसीसमोरच ऐकतिल,' असं ट्वीट रमीज राजा यांनी केलं आहे.

दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यानेही सीरिज रद्द झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 'सीरिज अचानक रद्द झाल्यामुळे निराश झालो आहे. लाखो पाकिस्तानी नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू परत आलं असतं. मला आमच्या सुरक्षा यंत्रणांवर आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास आहे. ते आमचा अभिमान आहेत आणि कायमच राहतील. पाकिस्तान जिंदाबाद,' असं ट्वीट बाबर आझमने केलं.

शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांनीही न्यूझीलंडवर टीका केली. 'एका अफवेच्या भीतीमुळे सगळी सुरक्षा असताना तुम्ही सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेतलात. न्यूझीलंड क्रिकेटला या निर्णयाच्या प्रभावाचा अर्थ कळतो का?' असा सवाल शाहिद आफ्रिदीने विचारला. तर न्यूझीलंडने आज पाकिस्तान क्रिकेटची हत्या केल्याची टीका शोएब अख्तरने केली.

PAK vs NZ : क्राईस्टचर्च गोळीबार विसरलात का? न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्यावर पाकिस्तानचा संताप

न्यूझीलंडने पहिली वनडे सुरू व्हायच्या काही मिनिटं आधी सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता बोर्ड आपल्या खेळाडूंना परत बोलावण्याची व्यवस्था करत आहे. आम्हाला जो सल्ला मिळाला, त्यानंतर दौरा सुरू ठेवणं अशक्य होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा धक्का असेल, पण खेळाडूंची सुरक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आमच्यासाठी हा एकमेव पर्याय होता, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे (NZC) मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी दिली.

First published:

Tags: Imran khan, New zealand, Pakistan Cricket Board