मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

PAK vs NZ : भारत-इंग्लंडनंतर आणखी एक वाद ICC च्या कोर्टात, पाकिस्तानची न्यूझीलंडविरुद्ध तक्रार

PAK vs NZ : भारत-इंग्लंडनंतर आणखी एक वाद ICC च्या कोर्टात, पाकिस्तानची न्यूझीलंडविरुद्ध तक्रार

भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट रद्द झाल्यानंतर आता आणखी एक वाद आयसीसीच्या कोर्टात गेला आहे. न्यूझीलंडची टीम पाकिस्तानमध्ये 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार होती, पण न्यूझीलंडने पहिल्या वनडेला अवघे काही तास शिल्लक असताना सीरिज खेळायला (PAK vs NZ Series Abandoned) नकार दिला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 17 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test Cancel) यांच्यातली मॅनचेस्टरमध्ये होणारी पाचवी टेस्ट रद्द करण्यात आली. टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानात उतरायला नकार दिला. टीम इंडियाचे फिजियो योगेश परमार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, पण इतर खेळाडू कोरोना निगेटिव्ह आले, तरी त्यांनी खेळण्यास नकार दिला, त्यामुळे टेस्ट मॅच रद्द करण्यात आली. टीम इंडिया या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर होती. आता सीरिजचा निकाल लावण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे धाव घेतली. त्यातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही आयसीसीचे दरवाजे ठोठावले. याचं कारणं ठरलं ते न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध खेळायला नकार देणं.

न्यूझीलंडची टीम पाकिस्तानमध्ये 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार होती, पण न्यूझीलंडने पहिल्या वनडेला अवघे काही तास शिल्लक असताना सीरिज खेळायला (PAK vs NZ Series Abandoned) नकार दिला. पाकिस्तानमधल्या सुरक्षेचं कारण देत न्यूझीलंडने सीरिज स्थगित केल्याचं सांगितलं. ही सीरिज वाचवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुरेपुर प्रयत्न केले. एवढच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशीही संवाद साधला, पण यात त्यांना यश आलं नाही.

क्राईस्टचर्च गोळीबार विसरलात का? न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्यावर पाकिस्तानचा संताप

न्यूझीलंडविरुद्धची सीरिज रद्द झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा (PCB Chairman Rameez Raja) यांनी संताप व्यक्त केला आहे. 'एक खराब दिवस. प्रशंसक आणि खेळाडू खूप दु:खी आहेत. सुरक्षा आणि धोक्याबाबत एक तर्फी भूमिका घेऊन दौऱ्याबाहेर जाणं निराशाजनक आहे. खासकरून जेव्हा ही गोष्ट न सांगता केली जाते. न्यूझीलंड कोणत्या दुनियेत जगत आहे? आता ते आमचं म्हणणं आयसीसीसमोरच ऐकतिल,' असं ट्वीट रमीज राजा यांनी केलं आहे.

दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यानेही सीरिज रद्द झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 'सीरिज अचानक रद्द झाल्यामुळे निराश झालो आहे. लाखो पाकिस्तानी नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू परत आलं असतं. मला आमच्या सुरक्षा यंत्रणांवर आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास आहे. ते आमचा अभिमान आहेत आणि कायमच राहतील. पाकिस्तान जिंदाबाद,' असं ट्वीट बाबर आझमने केलं.

शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांनीही न्यूझीलंडवर टीका केली. 'एका अफवेच्या भीतीमुळे सगळी सुरक्षा असताना तुम्ही सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेतलात. न्यूझीलंड क्रिकेटला या निर्णयाच्या प्रभावाचा अर्थ कळतो का?' असा सवाल शाहिद आफ्रिदीने विचारला. तर न्यूझीलंडने आज पाकिस्तान क्रिकेटची हत्या केल्याची टीका शोएब अख्तरने केली.

तालिबानशी हातमिळवणी करणाऱ्या पाकिस्तानची जगात नाचक्की, न्यूझीलंडनं टॉसपूर्वी केला दौरा रद्द

न्यूझीलंडने पहिली वनडे सुरू व्हायच्या काही मिनिटं आधी सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता बोर्ड आपल्या खेळाडूंना परत बोलावण्याची व्यवस्था करत आहे. आम्हाला जो सल्ला मिळाला, त्यानंतर दौरा सुरू ठेवणं अशक्य होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा धक्का असेल, पण खेळाडूंची सुरक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आमच्यासाठी हा एकमेव पर्याय होता, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे (NZC) मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी दिली.

First published:

Tags: New zealand, Pakistan Cricket Board