जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs SA T20: इंदूर टी20ची तिकिटं 15 मिनिटातच संपली, पाहा किती आहे तिकिटांची किंमत?

Ind vs SA T20: इंदूर टी20ची तिकिटं 15 मिनिटातच संपली, पाहा किती आहे तिकिटांची किंमत?

होळकर स्टेडियम, इंदूर

होळकर स्टेडियम, इंदूर

Ind vs SA T20: इंदूरमध्ये सध्या तिसऱ्या टी20 साठीची तयारी जोरात सुरु आहे. त्याचबरोबर अनेकांची मॅचची तिकीटं मिळावीत यासाठी पळापळ सुरु आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

इंदूर, 03 ऑक्टोबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला तिसरा टी20 सामना मंगळवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. इंदूर ही मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी मानली जाते. याच इंदूरमध्ये सध्या तिसऱ्या टी20 साठीची तयारी जोरात सुरु आहे. त्याचबरोबर अनेकांची मॅचची तिकीटं मिळावीत यासाठी पळापळ सुरु आहे. दरम्यान या मॅचची ऑनलाईन तिकीटं अवघ्या 15 मिनिटातच विकली गेली आहेत. त्यानंतर अनेक क्रिकेट चाहते मैदानाबाहेर ऑफलाईन तिकिटासाठी रांगेत उभे असलेले पाहायला मिळाले. पण तिथेही अनेकांच्या हाती काही लागलं नाही. अडीच वर्षानंतर सामना इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये अडीच वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जात आहे. याआधी 7 जानेवारी 2020 ला भारत आणि श्रीलंका संघांमध्ये अखेरचा सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा इंदूरमध्ये क्रिकेट चाहत्यांना लाईव्ह मॅचचा थरार अनुभवता येणार आहे. हेही वाचा -  Ind vs SA T20: गुवाहाटीत टीम इंडिया जिंकली पण रोहितचं टेन्शन पुन्हा वाढलं… पाहा नेमकं काय झालं? 15 मिनिटात तिकिटं ‘सोल्ड’ या सामन्यासाठी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशननं 25 हजार तिकिटं ऑनलाईन विक्रीसाठी ठेवली होती. पण महत्वाची बाब म्हणजे अवघ्या 15 मिनिटात ही सगळी तिकिटं विकली गेली. त्यात दिव्यांगांसाठी खास तिकिटं ठेवण्यात आली होती. त्या सर्व तिकिटांचीही विक्री झाली आहे. हेही वाचा -  Ind vs SA T20: वर्ल्ड कपआधी किंग कोहलीला आराम, तिसऱ्या टी20त होऊ शकतात हे मोठे बदल तिकिटाची किंमत किती? इंदूर टी20 साठीकमीत कमी तिकीट 449 रुपये इतकं आहे. तर जास्तीत जास्त तिकीट 5905 रु. इतकं आहे. इंदूर झालं क्रिकेटमय अडीच वर्षांनी इंदूरमध्ये क्रिकेटचा सामना होत असल्यानं अवघं इंदूर क्रिकेटमय झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरात अनेक ठिकाणी मोठमोठे स्क्रिन्स लावले जाणार आहेत. जिथे लाईव्ह मॅचचं प्रसारण केलं जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात