मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /On This Day: 15 वर्षांच्या करियरमध्ये 'या' खेळाडूनं पहिल्यांदाच वापरलं हेल्मेट

On This Day: 15 वर्षांच्या करियरमध्ये 'या' खेळाडूनं पहिल्यांदाच वापरलं हेल्मेट

रिचर्डसननं (Richie Richardson) त्याच्या करियरमधील 15 वर्ष एकदाही बॅटींग करताना हेल्मेट वापरलं नव्हतं. त्याला हेल्मेट बाबत विचारणं हा देखील गुन्हा समजला जात असे.

रिचर्डसननं (Richie Richardson) त्याच्या करियरमधील 15 वर्ष एकदाही बॅटींग करताना हेल्मेट वापरलं नव्हतं. त्याला हेल्मेट बाबत विचारणं हा देखील गुन्हा समजला जात असे.

रिचर्डसननं (Richie Richardson) त्याच्या करियरमधील 15 वर्ष एकदाही बॅटींग करताना हेल्मेट वापरलं नव्हतं. त्याला हेल्मेट बाबत विचारणं हा देखील गुन्हा समजला जात असे.

मुंबई, 8 एप्रिल : वेस्ट इंडिजच्या टीमचा (West Indies) 1970 आणि 1980 च्या दशकात क्रिकेट विश्वात दरारा होता. गॅरी सोबर्स, क्लाईव्ह लॉईड पासून सुरु झालेली ही परंपरा व्हिव रिचर्ड,  माल्कम मार्शल, ग्रिनीच हेन्स पर्यंत सुरु होती. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपासून ही परंपरा लोप होऊ लागली. वेस्ट इंडिजचे एक-एक दिग्गज खेळाडू रिटायर होऊ लागले. ब्रायन लारा (Brian Lara) आणि काही खेळाडूंनी त्यांची जागा घेतली.  पण वेस्ट इंडिजच्या टीममध्ये ती दहशत उरली नव्हती.

वेस्ट इंडिजच्या जुन्या आणि नव्या खेळाडूंना जोडणारा पूल होता त्यांचा कॅप्टन रिची रिचर्डसन (Richie Richardson). त्याने वेस्ट इंडिज क्रिकेटचा सुवर्ण काळ अनुभवला होता. चॅम्पियन टीममधील आपल्या एक-एक सहाकाऱ्याला त्याच्या रिटायरमेंटच्या वेळी जड मनानं त्यानं निरोप दिला होता. क्रिकेट विश्वातील वेस्ट इंडिजच्या वर्चस्वाचा सूर्य मावळतीला लागला असला तरी अजूनही रिचर्डसनचा मैदानातील निर्भिड वावर हा जुन्या काळाची आठवण देणारा होता.

रिचर्डसननं त्याच्या करियरमधील 15 वर्ष एकदाही बॅटींग करताना हेल्मेट वापरलं नव्हतं. त्याला हेल्मेट बाबत विचारणं हा देखील गुन्हा समजला जात असे. सुरवातीला पांढरी आणि नंतर लाल रंगाची टोपी घालून रिचर्डसन मैदानात उतरत असे. त्यानं त्याच वेशात हेल्मेटशिवाय जगभरातील फास्ट बॉलर्सचा सामना केला होता.

वेस्ट-इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया (West Indies vs Australia) यांच्यात 1995 साली झालेली टेस्ट सीरिज ही ऐतिहासिक ठरली.  त्या मालिकेतील दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजची टीम 0-1 ने पिछाडीवर होती. त्यामुळे आणखी एक टेस्ट वेस्ट इंडिजनं गमावली असती तर 15 वर्षांनी पहिल्यांदा कॅरेबियन टीम त्यांच्या देशात टेस्ट सीरिज हरणार होती.

त्यामुळे या दबावात वेस्ट इंडिजची टीम होती. आजच्याच दिवशी 1995 साली (8 एप्रिल 1995) क्रिकेट विश्वानं एक अभूतपूर्व दृश्य पाहिलं.  वेस्ट इंडिजचा कॅप्टन  रिचर्डसन चक्क हॅल्मेट घालून बॅटींगला आला होता. तब्बल 15 वर्षांनी आणि 78 व्या टेस्टमध्ये हा दुर्मिळ प्रकार घडला होता. ऑस्ट्रेलियन बॉलर्सचा सामना करण्यासाठी रिचर्डसननं हेल्मेट वापरलं. पण त्या कृतीकडं ऑस्ट्रेलियाकडून हरण्याच्या भीतीमुळे वेस्ट इंडिजच्या कॅप्टननं घेतलेला निर्णय असं पाहिलं गेल. रिचर्डसननं त्या इनिंगमध्ये  37 रन काढले. वेस्ट इंडिजनं ती टेस्ट ड्रॉ केली.

( वाचा: गावसकर आणि तेंडुलकरलाही तोडता आला नाही वेंगसरकरांचा 'हा' रेकॉर्ड )

त्यानंतर  सबीना पार्कमध्ये झालेली शेवटची टेस्ट ऑस्ट्रेलियानं जिंकून इतिहास घडवला. तब्बल 15 वर्षांनी वेस्ट इंडिजची टीम मायदेशात टेस्ट सीरिज हरली होती. वेस्ट इंडिज क्रिकेटची क्रिकेट विश्वावरील हुकूमत या पराभवानंतर संपली.

First published:
top videos

    Tags: Australia, Cricket, On this Day, West indies