मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /गावसकर आणि तेंडुलकरलाही तोडता आला नाही वेंगसरकरांचा 'हा' रेकॉर्ड

गावसकर आणि तेंडुलकरलाही तोडता आला नाही वेंगसरकरांचा 'हा' रेकॉर्ड

सुनील गावसकर  (Sunil Gavasakar) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या दोन महान बॅट्समनलाही जमला नाही असा एक अनोखा रेकॉर्ड करणारे भारताचे दिग्गज बॅट्समन दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांचा आज वाढदिवस आहे.

सुनील गावसकर (Sunil Gavasakar) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या दोन महान बॅट्समनलाही जमला नाही असा एक अनोखा रेकॉर्ड करणारे भारताचे दिग्गज बॅट्समन दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांचा आज वाढदिवस आहे.

सुनील गावसकर (Sunil Gavasakar) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या दोन महान बॅट्समनलाही जमला नाही असा एक अनोखा रेकॉर्ड करणारे भारताचे दिग्गज बॅट्समन दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांचा आज वाढदिवस आहे.

मुंबई, 6 एप्रिल : सुनील गावसकर  (Sunil Gavasakar) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे दोन भारतामधीलच नाही तर क्रिकेट विश्वातील महान बॅट्समन समजले जातात. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन आणि शतक करण्याचा विक्रम कित्येक वर्ष सुनील गावसकरांच्या नावावर होता. सध्या हा विक्रम सचिनच्या नावावर आहे. जगातील या दोन महान बॅट्समनलाही जमला नाही असा एक अनोखा रेकॉर्ड करणारे भारताचे दिग्गज बॅट्समन आणि टीम इंडियाचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांचा आज वाढदिवस आहे.

आजच्या दिवशी 1956 साली (6 एप्रिल 1956) दिलीप वेंगसरकर यांचा जन्म झाला. वेंगसरकर यांनी इंग्लंडमधील जगप्रसिद्ध लॉर्ड्सच्या (Lords) मैदानात तीन टेस्ट शतकं झळकावली आहेत. सुनील गावसकर  आणि सचिन तेंडुलकर यांनाही हा विक्रम करता आला नाही. लॉर्ड्सवर त्यांनी 1979, 1982 आणि 1986 मध्ये झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील सलग तीन टेस्टमध्ये शतक झळकावलं. लॉर्ड्सवर तीन शतक करणारे ते पहिले विदेशी बॅट्समन आहेत.

1970 आणि 80 च्या दशकात वेंगसरकर भारताचे प्रमुख बॅट्समन होते. कव्हर ड्राईव्ह, पुल आणि हूक या फटक्यांवर त्यांची हुकमत होती. स्पिन बॉलिंग सहजपणे खेळण्यातही त्यांचा हातखंडा होता. त्याचबरोबर फास्ट बॉलिंगही ते उत्तम पद्धतीनं खेळत. 1975 ते 1987 या काळात  पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या देशांविरुद्ध त्यांनी शतक झळकावलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकातामध्ये  1978-79 मध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्यांनी सुनील गावसकर यांच्यासबोत 344 रनची विक्रमी भागिदारी केली होती.

भारताचे कॅप्टन

भारतीय टीम 1987 च्या वर्ल्ड कपमध्ये पराभूत झाल्यानंतर कपिल देवच्या जागी वेंगसरकर यांची कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी कॅप्टन झाल्यानंतर पहिल्या दोन टेस्टमध्ये शतक झळकावून सुरुवात चांगली केली. त्यानंतर त्यांची कॅप्टनसी वादात सापडली. अखेर 1989 साली वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर त्यांची कॅप्टनसीवरुन हकालपट्टी करण्यात आली.

वेंगसरकर यांचं करियर

वेंगसरकर यांनी 116 टेस्टमध्ये 42.43 च्या सरासरीनं 6868 रन काढले. यामध्ये 17 शतक आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्यांनी 129 वन-डे मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. यामध्ये त्यांनी 34.73 च्या सरासरीनं 3508 रन बनवले. वेंगसरकर यांनी वन-डेमध्ये 1 शतक आणि 23 अर्धशतक झळकावली आहेत. 1992 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये वेंगसरकर त्यांच्या क्रिकेट करियरमधील शेवटची टेस्ट मॅच खेळले.

On This Day : जगाला पहिल्यांदा दिसली धोनीची पॉवर, पाकिस्तानची झाली होती वाताहत! )

विराट कोहलीची पहिल्यांदा निवड

दिलीप वेंगसरकर हे निवृत्तीनंतरही चांगलेच सक्रीय आहेत. एक स्तंभलेखक तसंच प्रशासक म्हणून त्यांची सेकंड इनिंगही गाजली आहे. निवड समितीचे अध्यक्ष असताना 2008 साली त्यांनी विराट कोहलीची पहिल्यांदा टीम इंडियामध्ये निवड केली होती. निवड समितीसमोर अनेक अनुभवी खेळाडूांचा पर्याय असूनही वेंगसरकर यांनी तेव्हा अगदी नवोदित असलेल्या विराटच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवला होता.

First published:

Tags: Cricket, On this Day