जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ‘RCB जिंकत नाही, तोपर्यंत लग्नच करणार नाही’ तरुणीसह पोस्टर व्हायरल

‘RCB जिंकत नाही, तोपर्यंत लग्नच करणार नाही’ तरुणीसह पोस्टर व्हायरल

‘RCB जिंकत नाही, तोपर्यंत लग्नच करणार नाही’ तरुणीसह पोस्टर व्हायरल

आतापर्यंत आरसीबी(Royal Challengers Bangalore) संघाने एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. यावेळी संघ चांगल्या लयीत असून आरसीबी चॅम्पियन होईल अशी आशा चाहत्यांना आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 एप्रिल: सलग चार पराभवानंतर शेवटच्या क्रमांकावर फेकलेल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) मंगळवारी पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 4 मध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal Challengers Bangalore) पराभव केला. दरम्यान, या सामन्यातील एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे. आरसीबीच्या एका चाहतीने ‘आरसीबी जिंकत नाही, तोपर्यंत लग्नच करणार नाही’ असा ध्यासच घेतला असल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या महाकुंभात प्रत्येक संघाचे चाहते आपल्या संघाशी असलेल्या जिव्हाळ्यापोटी मैदानात येऊन त्यांचा उत्साह वाढवत असतात. अशामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाची चाहती असलेल्या एका मुलीचा हातात पोस्टर घेतलेला फोटो जोरदार व्हायरल होत आहे. IPL 2022 : CSK चा अखेर विजय, दुबे-उथप्पाच्या वादळाचा RCB ला तडाखा आयपीएल 2022 मधील 22 वा सामना काल डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट अकादमी स्टेडिअम येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore) संघात पार पडला. या सामन्यादरम्यान बँगलोरची एक चाहती “जोपर्यंत आरसीबी संघ ट्रॉफी जिंकत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही.” अशा आशयाचे पोस्टर घेऊन स्टँडमध्ये उभी असल्याचे पाहायला मिळाले. तिच्या या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

जाहिरात

सध्या तिचे हे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. आतापर्यंत आरसीबी संघाने एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. यावेळी संघ चांगल्या लयीत असून आरसीबी चॅम्पियन होईल अशी आशा चाहत्यांना आहे. यावेळी आरसीबीचा संघ कर्णधार फाफ डू प्लेसिससोबत मैदानात उतरला आहे. या संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यामध्ये त्यांनी तीन सामने जिंकले आहेत. संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. यापूर्वी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीच्या हातात होते, पण तो संघाला आयपीएलचे एकही विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. यावेळी संघ कर्णधारासह इतिहास रचेल, अशी आशा आरसीबीच्या चाहत्यांना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात