Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'कोरोना'मुळे IPL रद्द होणार? 48 तासांत सौरव गांगुली मोठा निर्णय घेण्याची शक्यता

'कोरोना'मुळे IPL रद्द होणार? 48 तासांत सौरव गांगुली मोठा निर्णय घेण्याची शक्यता

भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढून 65च्या पुढे गेली आहे. तर IPL वरही कोरोना व्हायरसचं सावट

भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढून 65च्या पुढे गेली आहे. तर IPL वरही कोरोना व्हायरसचं सावट

भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढून 65च्या पुढे गेली आहे. तर IPL वरही कोरोना व्हायरसचं सावट

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 12 मार्च : कोरोनानं जगभरात हाहाकार पसरला आहे. या व्हायरसनं आता भारतातही जवळपास 4 ते 5 राज्यांमध्ये घुसखोरी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना महारोगराईची घोषणा केली आहे. आतापर्यंत 100 देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढून 65 च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेलेल आतापर्यंत 11 रुग्ण आढळले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे IPL 2020 सुद्धा सध्या संकटात सापडलं आहे. कारण IPL 2020 ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तर IPL रद्द केलं जाण्याची शक्यताही व्यक्त केलं जात आहे. कारण IPL वर बंदी घालण्यासाठी हायकोर्टात याचिका मद्रास कोर्टात दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारीच IPL 2020 चे सामने पुढे ढकलण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. आता याच पार्श्वभूमीवर मद्रास हायकोर्टातसुद्धा याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 48 तासांत IPL रद्द होणार की नाही? याबाबत सौरव गांगुली मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे. त्यांच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे वाचा-टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण! ‘हे’ चार खेळाडू लवकरच घेऊ शकतात निवृत्ती!

पुण्यात 8 मुंबईत 2, नागपूर आणि भिवंडीतही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं अधिवेशन एक आठवडा आधीच गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर राज्यातील मोठे सण-समारंभ आणि सभाही रद्द कऱण्यात आल्या आहेत. नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

देशभरातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहून केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीसाठी 15 एप्रिलपर्यंत पर्यटन व्हिसाही बंद करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून लागू होणार आहे. यासोबतच चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांमधून 15 फेब्रुवारीनंतर येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस स्वतंत्र कशात ठेवण्यात येणार आहे.

कधी होणार IPL सामने?

येत्या 29 मार्च ते 24 मे पर्यंत यावर्षी IPL रंगणार आहे. यंदाच्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये रंगणार आहे. त्यामुळे IPL 2020 च्या चाहत्यांमध्ये सामन्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्यातच आता कोरोना व्हायरसचं (corona virus) मोठं संकट उभं राहिल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी सुद्धा काही प्रमाणात व्यक्त केली जात आहे.

हे वाचा-IndvsSA 1st ODI : आफ्रिकेविरुद्ध तिघांचे पुनरागमन, पहिल्या समान्यात कोणाला संधी?

First published:

Tags: Corona virus, Corona virus in india, Ipl, Sourav ganguly