मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत झालेल्या दोन सामन्यात भारताने श्रीलंकेवर विजय मिळवून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. काल गुरुवारी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध झालेला दुसरा सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. परंतु या सामन्यादरम्यान भारतीय संघातील एका खेळाडूची तब्बेत बिघडली आहे. त्यामुळे हा खेळाडू श्रीलंके विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात संघासोबत दिसणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची तब्बेत बिघडली आहे. तब्बेत खालावल्याने ते श्रीलंके विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यानंतर कोलकाताहून थेट बंगळुरू येथील त्यांच्या घरी परतले आहेत. राहुल द्रविड यांनी 11 फेब्रुवारी रोजी त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा केला. श्रीलंका विरुद्ध मालिकेच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी राहुल द्रविड याला हॉटेलमध्येच अस्वस्थ वाटत होते. त्याचा रक्तदाब वाढला होता. औषध सेवन केल्यानंतर तो कोलकात्याच्या सामन्यादरम्यान संघा सोबत उपस्थित राहिला. परंतु सामना संपताच त्याने लगेचच बंगळुरू येथील त्याचे घर गाठले. बंगाल क्रिकेट बोर्डाने द्रविडसाठी डॉक्टर उपलब्ध करून दिला होता. अशा परिस्थितीत तो तिरुअनंतपुरममध्ये तिसऱ्या वनडेत भारतीय संघासोबत दिसणार नाही अशी माहिती मिळत आहे. हे ही वाचा : IPL : पंजाब किंग्सच्या खेळाडूने हिंदू कुटुंबाचे केले मुस्लिम धर्मांतर? पाक कर्णधाराच्या वक्तव्याने खळबळ राहुल द्रविडने 1996 मध्ये भारतीय संघासोबत कसोटी मालिकेत पदार्पण केले होते. राहुल द्रविडने भारतासाठी 164 कसोटी सामन्यांमध्ये 13288 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10889 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर तो सध्या भारतीय संघासोबत अनेक वर्षांपासून प्रशिक्षक म्हणून काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.