मुंबई, १३ जानेवारी : भारतात दरवर्षी आयोजित केली जाणारी आयपीएल ही टी २० लीग जगभरातील लोकप्रिय लीगपैकी एक आहे. या लीगमध्ये देशविदेशातील अनेक दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होत असतात. परंतु मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आयपीएलमधून पाकिस्तानी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र पाकिस्तान वगळता इतर देशातील खेळाडूं आयपीएलच्या संघांमध्ये सहभागी होऊन चांगली कामगिरी करताना पहायला मिळतात. मात्र अशातच आता आयपीएलच्या पंजाब संघाचा भाग असलेला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हाशिम आमला याने एका हिंदू कुटुंबाचे मुस्लिम धर्मांतर केल्याचा खळबळजनक दावा एका पाकिस्तानच्या माजी कर्णधार राहिलेल्या सईद अन्वर याने केला आहे.
सध्या पाकिस्तानचा माजी कर्णधार सईद अन्वर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सईद अन्वर याने २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने ७ कसोटी मालिकेत तर ११ वन डे मालिकेत पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे.
हे ही वाचा : आश्चर्यकारक! प्रेक्षकानं 104 मीटर लांबीचा सिक्स हवेतच अडवला; व्हिडिओ व्हायरल
सईद अन्वर एका कार्यक्रमात बोलत असताना त्याच्या भाषणाची एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे. ज्यात त्याने म्हंटले, की माशाल्लाह या वर्ल्ड कपमध्ये अनेक लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला केला. हाशिम आमला हा खूप जबरदस्त खेळाडू आहे. त्याच्या हाताखाली काम करत असलेल्या एका हिंदू कुटुंबाला त्याने मुस्लिममध्ये धर्मांतर केले. तसेच पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद युसूफ हा देखील अनेक लोकांसाठी जर्या बनला. अल्लाहने तुमच्यात खूप टॅलेंट दिल आहे, तेव्हा नेहमी अल्लाहला सोबत घेऊन तुमचं काम करा".
India invites Hashim Amla to make money in IPL. Amla returns favour by converting Hindus to Islam.
Reveals Pak captain Saeed Anwar Check our thread on #CricketJihad in next tweet pic.twitter.com/C5jVAiSyGO — Pakistan Untold (@pakistan_untold) January 12, 2023
सईद अन्वरच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. भारत हाशिम आमला याला आयपीएलमध्ये कमाई करण्यासाठी आमंत्रित करतो. परंतु हाच खेळाडू हिंदू धर्मियांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करीत आहे, अशा अर्थाने नेटकरी यावर नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच अनेकजण हा क्रिकेट जिहाद असल्याचे देखील म्हणत आहेत. हाशिम आमला हा त्याच्या आयपीएल करिअरमध्ये पंजाब किंग्स या संघांकडून खेळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, IPL 2023, Muslim, Pakistan