दुबई, 03 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका भारताचा फलंदाज केएल राहुलसाठी अनेक कारणांनी फायद्याची ठरली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्यावर अचानक यष्टीरक्षणाची जबाबदारी येऊन पडली. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाल्याने टीम इंडियाचे नेतृत्वही त्याला करावं लागलं. या सर्व जबाबदाऱ्या केएल राहुलने यशस्वीपणे पेलल्या असंच म्हणावं लागेल. केएल राहुलने हे सर्व करत असताना त्याची मुख्य फलंदाजाची जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने पार पाडली. यामुळे त्याने आयसीसीच्या टी20 क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आयसीसीने टी20 रँकिंग जाहीर केले असून यात पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर केएल राहुल, ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिंच, न्यूझीलंडचा कुलिन मुन्रो, इंग्लंडचा डेव्हिड मिलान, ग्लेन मॅक्सवेल यांचा नंबर लागतो. भारताचा उपकर्णधार रोहित शर्माच्या रँकिंगमध्ये तीन स्थानांची सुधारणा झाली असून त्याची टॉप टेनमध्ये वर्णी लागली आहे. तर कर्णधार विराट कोहली नवव्या स्थानावर कायम आहे.
⬆️ KL Rahul
— ICC (@ICC) February 3, 2020
⬆️ Rohit Sharma
The India openers have made significant gains in the latest @MRFWorldwide ICC T20I Player Rankings for Batting 👏
Full rankings 👉 https://t.co/EdMBslOYFe pic.twitter.com/h5K1fgkyiD
गोलंदाजांमध्ये अफगाणिस्तानच्या राशिद खानने त्याचे स्थान कायम राखले आहे. टॉप टेनमध्ये एकाही भारतीय गोलंदाजाला स्थान मिळालं नाही.
Full rankings release ⬇️https://t.co/FQiB5gafVG
— ICC (@ICC) February 3, 2020
ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झांम्पाने एका स्थानाने उडी मारली तर पाकच्या इमाद वासिम एका स्थानाने घसरला. भारताच्या जसप्रीत बुमराहने 26 स्थानांनी झेप घेतली असून तो रँकिंगमध्ये 11 व्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदर 22 व्या तर चहल 30 व्या स्थानावर आहे. वाचा : एका मिनिटाला एवढे पैसे! ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या जोकोविचला मिळणारी रक्कम ऐकून वाचा : टीम इंडियाला दंड! न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकली पण मिळणार नाहीत पूर्ण पैसे

)







