माऊंट माउंगानुई, 11 फेब्रुवारी : टी-20 मालिकेत 5-0ने न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर अशीच कामगिरी भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत करेल, असे वाटत होते. मात्र एकदिवसीय मालिकेत विपरीत परिणाम झाला. भारतानं तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-0ने गमावली. याचबरोबर जवळजवळ 30 वर्षांनंतर क्लीन स्वीप मिळाला आहे. तिसऱ्या सामन्यात भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करत केएल राहुलच्या शानदार शतकाच्या जोरावर किवींना 296 धावांचे बलाढ्य आव्हान दिले. मात्र न्यूझीलंडने 47.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत हा सामना जिंकला. न्यूझीलंडकडून सलामीवीर निकोलस आणि गुप्टिल यांनी शतकी भागीदारी केली. तर हेनरी निकोलसने सर्वात जास्त 80 चेंडूत 103 धावा केल्या. दरम्यान 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतावर क्लीन स्वीपची नामुष्की ओढावली आहे.
Colin de Grandhomme does it! Finishes it with a boundary to complete a 5 wicket win! He finishes 58* from 28 while Latham is 32* from 34. A 3-0 ODI series win over India. Scorecard | https://t.co/ME4kbXC4Jg #NZvIND pic.twitter.com/c4MMxES8rg
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 11, 2020
वाचा- 7 वर्षांनंतर विराटची फ्लॉप कामगिरी! ‘या’ आकड्यांनी केली कॅप्टन कोहलीची पोलखोल 1988-89नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतीय संघाला वनडे मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागणार आहे. 30 वर्षांपूर्वी टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 5-0 असा पराभव पत्करावा लागला होता. 2006मध्ये दक्षिण आफ्रिकेनेही भारताकडून 4-0 एकदिवसीय मालिका गमावली होती, परंतु त्यानंतर पावसामुळे पहिला वनडे सामना रद्द झाला होता. दरम्यान याआधी भारताने एकूण 11 एकदिवसीय कर्णधार झाले आहेत, मात्र असा पराभव भारताला मिळाला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला आज हा दिवसा पहावा लागला. वाचा- टी-20 मधले शेर वन-डेत ढेर! भारताचा 3-0ने लाजीरवाणा पराभव ज्या मैदानावर टी-20 मालिका जिंकली, तेथेच मिळवला क्लीन स्वीप भारतीय क्रिकेट संघाने माऊंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर तिसरी एकदिवसीय मालिका खेळली. यापूर्वी टीम इंडियाने दोन्ही एकदिवसीय सामने गमावले आहेत. विशेष म्हणजे टी -20 मालिकेत याच मैदानावर झालेल्या पाचव्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत केले. आता न्यूझीलंडनेही याच मैदानावर वनडे मालिकेत क्लीन स्वीप केला आहे. वाचा- टीम इंडियाचा नवा संकटमोचक! केएल राहुलनं झळकावलं शानदार शतक 9 धावा करत विराट झाला बाद विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध माऊंट माउंगानुई येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फक्त 9 धावा केल्या. यासाठी त्याने 12 चेंडूंचा सामना केला. या सामन्यात तो आपल्या स्टाईलच्या विपरीत शॉट खेळायला गेला. मात्र हॅमीश बेनेटने विराटला बाद केले. 2013नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा विराट कोहलीने सलग तीन वनडे द्विपक्षीय मालिकेत एकही शतक झळकावले नाही. भारतीय कर्णधाराचे शेवटचे शतक वेस्ट इंडिजविरुद्ध ऑगस्ट 2019 मध्ये आले होते. वाचा- अरे पृथ्वी शॉने काय केलं? स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड आणि संघाला टाकलं अडचणीत न्यूझीलंडविरुद्ध विराटची खेळी विराट कोहलीनं न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत एक अर्धशतक झळकावले आहे. या मालिकेत विराटने 51, 15 आणि 9 अशी खेळी केली आहे. टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेनंतर आता कसोटी मालिका खेळायची आहे. याचा पहिला सामना 21 फेब्रुवारी रोजी होईल. मात्र एकदिवसीय मालिकेतील विराटच्या खेळीमुळं चाहत्यांना हिरमोड झाला आहे.