माऊंट माउंगानुई, 11 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना होत आहे. क्लीन स्वीपची नामुष्की टाळण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. न्यूझीलंडने या सामन्यात टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतानं याआधी दोन्ही एकदिवसीय सामन्यात निराशाजनक कामगिरी करत मालिका गमावली आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने संघात बदल करत केदार जाधवच्या जागी मनीष पांडेला संघात स्थान दिले. मात्र सलामीवीरांना चांगली सुरुवात करता आली नाही. रोहित शर्माच्या दुखापतीमुळं सध्या पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल सलामीला फलंदाजी करत आहेत. या सामन्यात मयंक अग्रवाल 1 धाव करत बाद झाला. तर त्यानंतर कर्णधार विराट कोहली 9 धावांवर जेमिसनच्या हाती कॅच घेत बाद झाला. कोहलीने गेले कित्येक महिने एकही शतकी खेळी केलेली नाही आहे. न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही सामन्यात कोहलीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र या पृथ्वी शॉची विकेट सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे. लॅथमच्या गोलंदाजीवर 2 धाव काढण्याच्या नादात पृथ्वी शॉ धावबाद झाला. दुसरी धाव नसतानाही पृथ्वी धावला आणि बाद झाला. या सामन्यात पृथ्वी शॉ चांगली कामगिरी करेल, असे वाटत होते. मात्र त्याने स्वत:च्या हाताने विकेट टाकली. पृथ्वी शॉने भारतानं चांगली सुरुवात करून दिली. मात्र 42 चेंडूत 40 धावा करत शॉ धावबाद झाला.
Colin de Grandhomme with some superb outfield work to combine with Tom Latham and run out Prithvi Shaw for 40! De Grandhomme chases the ball down and rockets the ball in to get Shaw going for a second run. India 68/3 after 13. LIVE scoring | https://t.co/ME4kbXC4Jg #NZvIND pic.twitter.com/I9VKCT2r16
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 11, 2020
संघाला भासतेय रोहितची कमी पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी गेल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी केली असली तरी संघाला ती मजबूत सुरुवात देऊ शकली नाही. रोहितच्या अभावामुळे भारताला चांगलेच अडचणीत टाकले आहे. रोहितने गेल्या 12 महिन्यांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 57.30 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्या अनुपस्थितीत, धावा करण्याचा संपूर्ण संघ कोहलीवर आला, त्याने दोन सामन्यात 66 धावा केल्या. श्रेयस अय्यरने शतक व अर्धशतक ठोकले परंतु रॉस टेलरने दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघावर वर्चस्व राखले. अय्यर टिनरने चांगली कामगिरी केली म्हणून फिनिशरची भूमिका साकारू शकले नाही. 30 वर्षांत वनडे मालिकेत टीम इंडियाला मिळाला नाही क्लीन स्वीप न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 2-0 ने पिछाडीवर आहे. न्यूझीलंडने तिसरा सामनाही जिंकल्यास 1990नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतीय संघाला वनडे मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागणार आहे. 30 वर्षांपूर्वी टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 5-0 असा पराभव पत्करावा लागला होता. 2006मध्ये दक्षिण आफ्रिकेनेही भारताकडून 4-0 एकदिवसीय मालिका गमावली होती, परंतु त्यानंतर पावसामुळे पहिला वनडे सामना रद्द झाला होता. टीम इंडिया- पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, के.एल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर,नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह न्यूजीलंडचा संघ- मार्टिन गुप्टिल, हेनरी निकोल्स, केन विल्यम्सन, रॉस टेलक, टॉम लाथम, जेम्स नीशम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, मिचेल सेंटनर, टिम साउदी, कयेले जेमीसन, हामिश बेनेट

)







