माऊंट माउंगानुई, 11 फेब्रुवारी : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा केव्हा मैदानात उतरला आहे, तो विक्रम करूनच माघारी परतला. फार कमी वेळा विराटनं फ्लॉप खेळी केली आहे. त्यामुळं त्याच्या चाहत्यांसाठी ही सर्वात धक्कादायक बाब असते. कारण विराटच्या बॅटने धावा आल्या नाहीत, असा प्रकार सहसा घडलेला नाही आहे. मात्र, विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत एक शतकही करु शकला नाही, तेव्हा या आकड्यावर विश्वास ठेवणे अशक्य होते. आता जर आपण आकडेवारीचा विचार केला तर गेल्या सात वर्षातील विराट कोहलीची ही सर्वात वाईट कामगिरी आहे.
विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध माऊंट माउंगानुई येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फक्त 9 धावा केल्या. यासाठी त्याने 12 चेंडूंचा सामना केला. या सामन्यात तो आपल्या स्टाईलच्या विपरीत शॉट खेळायला गेला. मात्र हॅमीश बेनेटने विराटला बाद केले. 2013नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा विराट कोहलीने सलग तीन वनडे द्विपक्षीय मालिकेत एकही शतक झळकावले नाही. भारतीय कर्णधाराचे शेवटचे शतक वेस्ट इंडिजविरुद्ध ऑगस्ट 2019 मध्ये आले होते.
Kane Williamson is better tactical captain than virat Kohli ,he always trapped virat Kohli wicket with his tactics.he knows virat's weakness better than others captain in the world.
विराट कोहलीनं 2019 ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या मालिकेत 2 शतक लगावले होते. त्यानंतर वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यात विराटने 16, 78 आणि 89 धावांची खेळी केली. वेस्टइंडीजविरुद्ध 4, 0 आणि 85 धावा केल्या.
Last Time When Kohli Had 25 Or Less Average In a 3 Or More Match ODI Series Was Back In June 2015 Vs BAN Where He Scored 49 Runs In 3 ODIs @ 16.33#NZvsIND#INDvNZ
विराट कोहलीनं न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत एक अर्धशतक झळकावले आहे. या मालिकेत विराटने 51, 15 आणि 9 अशी खेळी केली आहे. टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेनंतर आता कसोटी मालिका खेळायची आहे. याचा पहिला सामना 21 फेब्रुवारी रोजी होईल. मात्र एकदिवसीय मालिकेतील विराटच्या खेळीमुळं चाहत्यांना हिरमोड झाला आहे.