IND vs NZ : टी-20 मधले शेर वन-डेत ढेर! भारताचा 3-0ने लाजीरवाणा पराभव

IND vs NZ : टी-20 मधले शेर वन-डेत ढेर! भारताचा 3-0ने लाजीरवाणा पराभव

न्यूझीलंडने तिसरा सामनाही जिंकल्यास 1990नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतीय संघाला वनडे मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागणार आहे.

  • Share this:

माऊंट माउंगानुई, 11 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला लाजीरवाणा पराभव सहन करावा लागला. भारतानं अखेरचा सामनाही गमावत या मालिकेत क्लीन स्वीप मिळवला. न्यूझीलंडने 17 चेंडू राखत 5 विकेटनं हा सामना जिंकला. 30 वर्षांनंतर भारतावर क्लीन स्वीपची नामुष्की ओढावली आहे. भारताने दिलेल्या 297 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि हेन्री निकोलस यांनी 106 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर चहलनं गुप्टिलला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. गुप्टिल 66 धावांवर बाद झाला. मात्र निकोलसने 80 धावांची खेळी करत न्यूझीलंडचा विजयाच्या जवळ नेले. त्यानंतरही फॉर्ममध्ये असलेल्या केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी लवकर बाद करत भारताने या सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र टॉम लॅथम आणि ग्रॅंडहोम यांनी धावांची विजयी भागीदारी केली.

तत्पूर्वी न्यूझीलंडने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी करत केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांच्या शानदार खेळीमुळे भारताने न्यूझीलंडला 297 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात केएल राहुलने 104 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस शतकी खेळी करणारा केएल राहुल दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सुरैश रैनाने 2015मध्ये अशी कामगिरी केली होती. मात्र भारताला विजय मिळवता आला नाही. भारताकडून युजवेंद्र चहलने 3 विकेट घेतल्या.

याआधी श्रेयस अय्यरने 62 धावांची खेळी केली होती. राहुल आणि अय्यर यांनी शतकी भागीदारी केल्यानंतर अय्यर बाद झाला. शतकी खेळी केल्यानंतर राहुल 112 धावांवर बाद झाला, त्यानंतर लगेचच मनीष पांडेही 42 धावांवर बाद झाला. त्याआधी रोहित शर्माच्या दुखापतीमुळं सध्या पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल सलामीला फलंदाजी करत आहेत. या सामन्यात मयंक अग्रवाल 1 धाव करत बाद झाला. तर त्यानंतर कर्णधार विराट कोहली 9 धावांवर जेमिसनच्या हाती कॅच घेत बाद झाला. कोहलीने गेले कित्येक महिने एकही शतकी खेळी केलेली नाही आहे. न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही सामन्यात कोहलीला चांगली कामगिरी करता आलेली नाही.न्यूझीलंडकडून हामिश बेनेटने सर्वात जास्त 4 विकेट घेतल्या.

30 वर्षांत वनडे मालिकेत टीम इंडियाला मिळाला नाही क्लीन स्वीप

न्यूझीलंडने तिसरा सामनाही जिंकल्यास 1990नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतीय संघाला वनडे मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागणार आहे. 30 वर्षांपूर्वी टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 5-0 असा पराभव पत्करावा लागला होता. 2006मध्ये दक्षिण आफ्रिकेनेही भारताकडून 4-0 एकदिवसीय मालिका गमावली होती, परंतु त्यानंतर पावसामुळे पहिला वनडे सामना रद्द झाला होता.

विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय

टी-20 मालिकात चांगली कामगिरी करणाऱ्या विराटला एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली गेल्या काही सामन्यात सतत बोल्ड आऊट होत आहे. या सामन्यात मात्र विराट झेलबाद झाला. त्याला केवळ 9 धावा करता आल्या. ऑकलंडमधील दुसऱ्या सामन्यात कोहलीला टीम साऊदीने बोल्ड केले होते. आपल्या 12 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच विराटवर अशी नामुष्की ओढावली आहे.

टीम इंडिया- पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, के.एल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर,नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह.

न्यूजीलंडचा संघ- मार्टिन गुप्टिल, हेनरी निकोल्स, केन विल्यम्सन, रॉस टेलक, टॉम लाथम, जेम्स नीशम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, मिचेल सेंटनर, टिम साउदी, कयेले जेमीसन, हामिश बेनेट.

First published: February 11, 2020, 11:17 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या