मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

VIDEO: गोल्डन बॉय Neeraj Chopra सांगतोय- बायको अशी हवी...

VIDEO: गोल्डन बॉय Neeraj Chopra सांगतोय- बायको अशी हवी...

Neeraj Chopro on Dance+ 6: सुवर्ण कामगिरीनंतर लाखो तरुणींचा क्रश असलेला नीरजने आता बायको कशी हवी आहे यावर भाष्य केलं आहे. एका कार्यक्रमात त्याने त्याला बायको कशी हवी याचा खुलासा केला आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: टोक्यो ऑलिम्पिकमध्ये धमाकेदार (Tokyo Olympic 2020) कामगिरी करणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सुवर्ण कामगिरीनंतर लाखो तरुणींचा क्रश असलेला नीरज आता बायको कशी हवी आहे या गोष्टीवर भाष्य करु लागला आहे. अनेकजणांकडून नीरज चोप्राच्या गर्लफ्रेंडचं नाव इंटरनेटवर (Google Search of Neeraj Chopra Girlfriend) सर्च करण्यात येत आहे. तर काही जण त्याच्या विवाहाविषयीच्या प्लॅनिंगविषयी जाणून घेऊ इच्छित आहेत. दरम्यान, एका कार्यक्रमात त्याने त्याला बायको कशी हवी याचा खुलासा केला आहे.

नुकतचं नीरज चोप्राने डान्स प्लस 6 च्या शोमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती दर्शवली होती. शोच्या दरम्यान, शो होस्ट करणारा राघव जुयाल (Raghav Juyal and Neeraj Chopra) याने फिमेल फॅन्सच्यावतीने नीरज चोप्राला विचारले की, नीरज चोप्रासोबत आपली कुंडली कशी मॅच करावी. हा प्रश्न ऐकून नीरज चोप्रा थोडा लाजला. त्याने हा प्रश्न हसण्यावारी नेत सांगितले की, त्याला याबाबत काही माहिती नाही आहे.

हे वाचा- RCB vs RR, Dream 11 Prediction : 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं नशीब

मात्र प्रश्नांची ही मालिका इथेच थांबली नाही. शोचा परिक्षक पुनीत पाठक याने नीरजला सांगितले की, सर्व मुलींच्यावतीने मी तुला एक प्रश्न विचारतो की तुला कशा प्रकारची मुलगी आवडते, त्यावर तिथे बसलेले सर्व स्पर्धक हसू लागले आणि नीरज चोप्राच्या उत्तराची वाट पाहू लागले.

तर नीरजला अशी हवीय मुलगी

प्रश्नाचं नीरज चोप्रा उत्तर देणार तेवढ्यात रावघ याने जेवलीनसारखी मुलगी हवीय का असा प्रतिप्रश्न केला. त्यावर नीरजने हसत हसत सांगितले की, नको, नको, एवढी उंच असेल तर काय करणार असा गमंतशीर सवाल उपस्थित करत नेमकी कशी बायको हवी आहे हे सांगितले.

नीरज पुढे म्हणाला की, सध्यातरी असे काही नाही. मात्र एक खेळाडू असल्याने मला वाटते की तीही खेळाडू असावी. तिचे तिच्या कामावर लक्ष असावे. तिने इतरांचा आदर करावा. तसेच ती कुटुंबाचा आदर करणारी असावी. टोक्यो ऑलिम्पिक जिंकल्यानंतर नीरजच्या फॅनफॉलोअर्समध्ये तुफान वाढ झाली आहे. यात तरुणींच्या गळ्यातला तो जणू ताईत झाला आहे

First published:

Tags: Olympics 2021