मुंबई, 29 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यात लढत होणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या आरसीबीनं 10 मॅचमध्ये 12 पॉईंट्सची कमाई केली आहे. बंगळुरुची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी रॉयल्सचा पराभव केला तर 'प्ले ऑफ' मधील त्यांची जागा जवळपास नक्की होईल.
दुसरिकडं राजस्थान रॉयल्सचे 10 मॅचनंतर 8 पॉईंट्स आहेत. त्यामुळे त्यांना ही मॅच करो वा मरो पेक्षा कमी नसेल. बंगळुरु विरुद्ध पराभव झाल्यास राजस्थानची स्पर्धेतील वाटचाल खडतर होणार आहे. यूएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या सेकंड फेजमध्ये दोन्ही टीमची वाटचाल अडखळती आहे. आरसीबीनं पहिल्या दोन मॅच गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. तर राजस्थाननं पहिली मॅच 2 रननं जिंकल्यानंतर पुढील दोन मॅच गमावल्या आहेत.
युजवेंद्र चहलला डच्चू दिल्याने सेहवाग नाराज, BCCI कडे मागितलं स्पष्टीकरण
दोन रॉयल्स टीममध्ये होणाऱ्या या लढतीकडं मुंबई इंडियन्सचंही (Mumbai Indians) लक्ष असेल. कारण, राजस्थाननं या मॅचमध्ये विजय मिळवल्यास ते पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर जातील. पंजाब किंग्जला (Punjab Kings) पराभूत केल्यानंतर मुंबई इंडियन्स सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.
RCB vs RR Dream 11
कॅप्टन - ग्लेन मॅक्सवेल
व्हाईस कॅप्टन - एबी डिविलियर्स
विकेट किपर - संजू सॅमसन
बॅटर - विराट कोहली, एविन लुईस, एबी डिविलियर्स, देवदत्त पडिक्कल
बॉलर - कार्तिक त्यागी, हर्षल पटेल, चेतन सकारिया, काईल जेमीसन
संभाव्य टीम
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, केएस भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, शाहबाज अहमद, डॅनियल ख्रिस्टीन/हसरंगा, काईल जेमीसन, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज
राजस्थान रॉयल्स : एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कॅप्टन), लियाम प्लंकेट/डेव्हिड मिलर, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवातिया, ख्रिस मॉरीस, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया आणि मुस्तफिजून रहमान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Rajasthan Royals, RCB