नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) टेस्ट सिरीज 25 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, क्रिकेट जगतातून मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाच्या (Team India) रणनीतीमध्ये बदल होण्याची शक्यता असून टीम इंडिया मॅनेजमेंटने भारताच्या टेस्ट (Test match) ओपनिंगमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
टेस्ट सिरीजमधील पहिली मॅच कानपूर येथे खेळवण्यात येणार आहे. दरम्यना, सुत्रांच्या माहीतीनुसार, कोच राहुल द्रविड टीम इंडियाच्या रणनीतीमध्ये करणार आहेत. सलामीवीर म्हणून सतत फ्लॉप ठरत असलेल्या शुभमन गिलला हटवण्याचा निर्णय टीम इंडियाने घेतला आहे.
शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मधल्या फळीत खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल टीम इंडियाच्या सलामीची जबाबदारी सांभाळतील. असे सांगण्यात येत आहे.
रोहित शर्माला कसोटी मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे मयंक अग्रवालला संधी मिळणार आहे. मयंक अग्रवाल इंग्लंड दौऱ्यावर एकही सामना खेळू शकला नाही. सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि केएल राहुलने सांभाळली होती.
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील नवीन निवड समिती आणि सध्याच्या संघ व्यवस्थापनाला असे वाटते की त्यांना कोहलीशिवाय मधल्या फळीत किमान एका खेळाडूची गरज आहे, जो त्याच्या आक्रमणाने विरोधी संघाला अडचणीत आणू शकेल. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीची फलंदाजीची शैली जवळपास सारखीच आहे, असे त्याचे मत आहे.
गिलला ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण करण्याची संधी देणारे माजी राष्ट्रीय निवडकर्ते जतीन परांजपे यांनीही समर्थन केले. परांजपे म्हणाले, संघ निवडीत एकसमानता मदत करत नाही, असे माझे नेहमीच मत आहे. मला वाटते की शुभमनला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळणे संघाला उपयुक्त ठरेल. हे नेहमीच अतिरिक्त पर्याय देण्यास मदत करेल.
न्यूझीलंडविरुद्ध, ऋद्धिमान साहा हा संघाचा मुख्य यष्टिरक्षक आहे, जो ऋषभ पंतच्या विपरीत बचावात्मक फलंदाजीसाठी ओळखला जातो. रोहित, कोहली आणि पंतशिवाय फलंदाजी करण्यासाठी आक्रमक फलंदाजांची गरज असते आणि गिल योग्य आहे. त्याच्याकडे जवळपास सर्व शॉट्स आहेत. दुसऱ्या नव्या चेंडूवरही तो चांगली कामगिरी करू शकतो.
परांजपे म्हणाले, “केएल राहुलने मधल्या फळीत फलंदाजी केली आणि कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला काही यश मिळाले. शुभमन याची पुनरावृत्ती करू शकतो. संघाच्या गरजेनुसार भूमिका बदलण्यात युवा फलंदाजाला फारसा त्रास होत नाही.
निवडकर्त्यांनी श्रेयस अय्यरचा मधल्या फळीतील विशेषज्ञ फलंदाज म्हणून समावेश केला आहे पण मुंबईच्या खेळाडूला त्याच्या कसोटी पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण. (विराट कोहली दुसऱ्या सामन्यात उपलब्ध असेल)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India team selection, New zealand, Team india, Test match, Test series