जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / श्रेयस अय्यरचा ‘धोनी’ अवतार! हेलिकॉप्टर शॉटचा VIDEO VIRAL

श्रेयस अय्यरचा ‘धोनी’ अवतार! हेलिकॉप्टर शॉटचा VIDEO VIRAL

श्रेयस अय्यरचा ‘धोनी’ अवतार! हेलिकॉप्टर शॉटचा VIDEO VIRAL

मुंबईकर श्रेयस अय्यरच्या अंगात संचारला धोनी! असा शॉट तुम्ही पाहिला नसेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 29 नोव्हेंबर : क्रिकेट जगतात प्रत्येक खेळाडूची एक वेगळी स्टाईल असते. काही शॉट हे त्या क्रिकेटपटूची ओळख झाली आहे. जसा हेलिकॉप्टर शॉट हा महेंद्रसिंग धोनीमुळे ओळखला जातो. मात्र आता धोनीचा शॉट आता सर्व युवा खेळाडू खेळताना दिसत आहेत. मात्र धोनीच्या या शॉटला मुंबईकर श्रेयस अय्यरनं न्याय दिले आहे. सैयद मुश्ताक अलीमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या श्रेयस अय्यरचा धोनी अवतार पाहायला मिळाला. यावेळी सोशल मीडियावर सध्या श्रेयस अय्यरनं मारलेला हेलिकॉप्टर शॉट ट्रेंड होत आहे. सध्या क्रिकेटमध्ये सर्वच खेळाडू धोनीचा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करतात. मात्र खुप खेळाडू आहेत, ज्यांना यशस्वीपणे हा शॉट खेळता आला. दरम्यान पंजाब आणि मुंबई यांच्यात लीग स्टेजमध्ये श्रेयस अय्यरनं हेलिकॉप्टर शॉट मारत षटकार लगावला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात यॉर्कर चेंडूवर अय्यरनं हेलिकॉप्टर शॉट लगावला. यावेळी समालोचकांनी धोनी खेळत असल्याचा भास होत आहे, असे मत व्यक्त केले होते. वाचा- ‘भारतीयांमध्ये काय कमी आहे?’, IPL संघांवर भडकला राहुल द्रविड

    जाहिरात

    वाचा- VIDEO : फलंदाजाचा शॉट नडला, चक्क गोलंदाज करतायत हेल्मेट घालून बॉलिंग या सामन्यात अय्यरनं आक्रमक फलंदाजी करत धोनी अवतार संचारल्याप्रमाणे फलंदाजी केली. 40 चेंडूत अय्यरनं 80 धावा केल्या. यात अय्यरनं मोठे षटकार लगावले. याआधी बांगलादेश विरोधात अय्यरनं अशी कामगिरी केली होती. अय्यरच्या या आक्रमक अवतारामुळं त्यानं टीम इंडियामध्ये आपली जागा मिळवली. वाचा- काय म्हणावं या शॉटला? फलंदाजाची अतरंगी बॅटिंग पाहून प्रेक्षकही चक्रावले वेस्ट इंडिज विरोधात 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत अय्यरला संघात जागा मिळाली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात