जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / काय म्हणावं या शॉटला? फलंदाजाची अतरंगी बॅटिंग पाहून प्रेक्षकही चक्रावले, पाहा VIDEO

काय म्हणावं या शॉटला? फलंदाजाची अतरंगी बॅटिंग पाहून प्रेक्षकही चक्रावले, पाहा VIDEO

काय म्हणावं या शॉटला? फलंदाजाची अतरंगी बॅटिंग पाहून प्रेक्षकही चक्रावले, पाहा VIDEO

हा VIDEO पाहून तुम्हीच ठरवा काय असेल या शॉटचे नाव.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 29 नोव्हेंबर : क्रिकेट जगतात प्रत्येक खेळाडूची एक वेगळी स्टाईल असते. त्यामुळं ज्याप्रकारे हे क्रिकेटपटू शॉट खेळतात, त्याप्रमाणे त्यांना एक-एक नावं दिली गेली होती. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या शॉटला नक्की काय म्हणाल, असा प्रश्न आयसीसीलाही पडला. न्यूझीलंड (New Zealand)मध्ये होत असलेल्या एकदिवसीय स्पर्धेत फोर्ड ट्रॉफीमध्ये ग्लेन फिलिप्स (Glenn Philips) याने आपल्या फलंदाजीनं गोलंदाजीची दाणादाण उडवली. ऑकलंड (Auckland) आणि ओटागो (Otago) संघांदरम्यानच्या या सामन्यात ऑकलंडचा फलंदाज ग्लेनने 135 चेंडूत 156 धावांची दमदार खेळी केली. यावेळी, त्याच्या शॉट खेळण्यासाठी उभ्या राहण्याच्या शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय त्याच्या एका शॉटचा विडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. वाचा- BCCIचा प्रश्न; पृथ्वी शॉच्या बॅटवर कोणाची स्वाक्षरी? टी-20 क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून आक्रमक फलंदाजी करत वेगवान धावा करण्यास सुरुवात झाली. यासगळ्यात, क्रिकेटच्या मैदानावर आणखी एक आगळा-वेगळा शॉट न्यूझीलंडमधील या स्पर्धेत पाहायला मिळाला, जो पूर्णपणे वेगळा शॉट होता. ऑकलंडच्या ग्लेनने एक अनोखा रिव्हर्स शॉट खेळला. फिलिप्सचा हा अनोखा रिव्हर्स शॉट पाहून विरोधी संघातील खेळाडू आणि प्रेक्षकही थक्क झाले. फिलिप्सनं षटकारासाठी लागवलेला हा शॉट क्रिकेटमध्ये पहिले कधीही पाहायला मिळाला नव्हता की या शॉटची दाखल खुद्द आयसीसीनेही घेतली. आयसीसीने ट्विटरवर फिलिप्सच्या या शॉटचा व्हिडिओ शेअर करत ‘या शॉटचे नाव’ विचारले. वाचा- फलंदाजांची भंबेरी उडवणारा दिग्गज फिरकीपटू आता झाला राज्यपाल!

    जाहिरात

    वाचा- VIDEO : फलंदाजाचा शॉट नडला, चक्क गोलंदाज करतायत हेल्मेट घालून बॉलिंग या सामन्यात फिलिप्स आणि मार्टिन गुप्टिल यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर ऑकलंडने 50 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 310 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करताना ओटागोचा नील ब्रूम याने 66 धावांची खेळी केली. मात्र एकाही फलंदाजाला विशेष चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे संपूर्ण संघ 213 बाद झाला. ऑकलंडने 97 धावांनी विजयाची नोंद केली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात