नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : क्रिकेटच्या मैदानावर कधी काय घडेल ते सांगता येणार नाही. फलंदाजांच्या डोक्याला चेंडू लागून मृत्यू झाल्याचे प्रकारही या खेळात घडले आहेत. डोक्याला चेंडू लागण्याचा भितीनं हेल्मेटच्या नियमांमध्येही नवे बदल करण्यात आले. मात्र कधी गोलंदाजाला हेल्मेट घालून गोलंदाजी करताना पाहिले आहे? होय, असा प्रकार नुकत्याच एका सामन्यात घडला. क्रिकेटमध्ये एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. हेल्मेट घातलेल्या फलंदाजासमोर गोलंदाजी करताना गोलंदाजनेही हेल्मेट घातला होता. न्यूझीलंडचा गोलंदाज अॅड्रयू अॅलिसनं (Andrew Ellis) हेल्मेट घालून गोलंदाजी केली. फोर्ड ट्रॉफीच्या गेल्या हंगामात अॅलिसच्या डोक्याला चेंडू लागला होता. त्यानंतर आता अॅलिसनं चक्क हेल्मेट घालून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वाचा- प्राणीसंग्रहालयात पर्यटकांसोबत अस्वल खेळला लपाछुपी, VIDEO पाहून तुम्हीही हसाल न्यूझीलंडसाठी 15 एकदिवसीय आणि 5 टी-10 सामना खेळणाऱ्या अॅलिसनं फोर्ड ट्रॉफीमध्ये कॅंटरबरी आणि नॉर्दन डिस्ट्रिक यांच्यात झालेल्या सामन्यात हेल्मेट घालून गोलंदाजी केली. गेल्या हंगामात अॅलिसला जीत रावल या फलंदाजानं मारलेले चेंडू डोक्याला लागला होता. एवढेच नाही तर चेंडू गोलंदाजाच्या डोक्याला लागून बाउंड्री पार गेला होता. या घटनेनंतर सफेद चेंडूनं होणाऱ्या अपघातांच्या चर्चा वाढल्या. त्यामुळं आता गोलंदाजांनी स्वत: हेल्मेट घालून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वाचा- नवरदेव झाला खतरों का खिलाडी! थेट स्काय डाईव्ह करत पोहचला लग्न मंडपात
WICKET | Andrew Ellis strikes second ball and breaks the partnership. @ndcricket are now 73/2 after 11. #wearecanterbury #cricketnation #fordtrophy pic.twitter.com/rUas1YbkDj
— Canterbury Cricket (@CanterburyCrick) November 27, 2019
वाचा- तुमच्या स्मार्टफोनचा विमा काढलात का? होणार नाही नुकसान डिसेंबर 2017मध्ये जलद गोलंदाज बार्न्सचं हेल्मेट घालून सर्वात आधी गोलंदाजी केली होती. हा हेडगिअर हेल्मेट सारखाच दिसत होता. आता या हेडगिअरचा वापर क्रिकेटमध्ये सर्रास केला जात आहे.

)







