लखनऊ, 29 नोव्हेंबर : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या क्रिकेटची नवी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान लखनऊमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना आयपीएल संघांवर टीका केली आहे. आयपीएल ही भारतीय स्पर्धा असूनही यात विदेशी प्रशिक्षकांवर जास्त भर दिला जात आहे, यावर द्रविडनं नाराजी व्यक्त केली. द्रविड सध्या भारत-अफगाणिस्तान यांच्यीतल अंडर-19 संघात होणाऱ्या सामन्यासाठी सराव वर्ग घेत आहे. आयपीएलबाबत नाराजी व्यक्त द्रविडनं, “भारतात चांगले प्रशिक्षक आहेत. जसे आपल्याकडे चांगले क्रिकेटर आहेत तसेच कोचिंग स्टाफही उत्तम आहे. मात्र ही आपली जबाबदारी आहे की त्यांना आत्मविश्वास आणि संधी द्यावी”, असे सांगितले. द्रविड भारतीय अंडर-19 आणि इंडिया एचे प्रशिक्षक म्हणून काम करतो. त्याचबरोबर आयपीएलमध्ये राजस्थान आणि दिल्ली संघासाठी प्रशिक्षक म्हणून याआधी काम केले आहे. वाचा- आज पुन्हा मौका-मौका! पाकिस्तानला चारीमुंड्या चित करण्यासाठी भारत सज्ज राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदात भारतानं अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला. ऐवढेच नाही तर राहुल द्रविडमुळे भारताला उत्तम युवा खेळाडूही मिळाले आहे. सध्या ज्युनिअर संघाचे कमलेश नागारकोटी, शिवम मावी आणि ईशान पोरेल चांगली कामगिरी करत आहे. या तिघांना आयपीएलमध्येही संधी मिळाल्या आहेत. याबाबत बोलताना द्रविडनं, “भविष्यात अंडर-19 संघाला चांगले गोलंदाज मिळतील. प्रत्येक वर्षी आम्हाला चांगले गोलंदाज मिळाले आहेत”, असे सांगितले. वाचा- काय म्हणावं या शॉटला? फलंदाजाची अतरंगी बॅटिंग पाहून प्रेक्षकही चक्रावले तसेच, भारतीय गोलंदाजांच्या गुणवत्तेवर बोलताना द्रविडनं, सध्या भारतीय संघात गोलंदाजी आक्रमक आहे. जसप्रीत बुमराह आहे, त्याशिवाय मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्यासारखे दमदार जलद गोलंदाज आहेत. या गोलंदाजांमुळेच भारतीय संघ सलग सामने जिंकत आहे. त्यामुळं युवा खेळाडू त्यांना फॉलो करतात. याचे श्रेय नक्कीच बीसीसीआयला जाते”, असेही मत व्यक्त केले. वाचा- BCCIचा प्रश्न; पृथ्वी शॉच्या बॅटवर कोणाची स्वाक्षरी?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







