मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : टीम इंडियालाही कोरोनाचा धोका? विराटसह सर्व खेळाडूंची होणार फिटनेस टेस्ट

IND vs SA : टीम इंडियालाही कोरोनाचा धोका? विराटसह सर्व खेळाडूंची होणार फिटनेस टेस्ट

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होईल.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होईल.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होईल.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 10 मार्च : न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होईल. यासाठी 15 खेळाडूंचा संघ याआधीच जाहीर करण्यात आला आहे. मात्र, आता भारतीय संघातील सर्व खेळाडूंना मालिकेआधी फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. भारत-आफ्रिका यांच्यातील पहिला सामना धर्मशाला येथे होणार आहे. त्याआधी टीम इंडिया बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस टेस्ट करतील. मात्र अचानक भारतीय संघाची फिटनेस टेस्ट का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाचा-6 महिन्यांनंतर हार्दिकचा कमबॅक! पांड्यासाठी ‘या’ 2 खेळाडूचं करिअर संपवणार विराट कोरोनाव्हायरस असू शकते कारण भारतीय संघाची निवड होण्याआधी खेळाडूंची फिटनेस टेस्ट करण्यात येते. मात्र आता भारतीय संघाची निवड झाल्यानंतरही टेस्ट करण्यात येणार आहे. याचे कारण कोरोना व्हायरस (COVID-19) असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र भारतात वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे हा निर्णय घेण्यात आला असावा. वाचा-पांड्या इज बॅक! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियातून 'या' खेळाडूंना वगळलं दक्षिण आफ्रिकेचा संघ दिल्लीत दाखल भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. यासाठी आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शोएब मांजरा देखील त्यांच्यासोबत आहेत. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन (COVID-19) ज्यांना टीमसह सोबत आणण्यात आले आहे. भारतात कोरोना विषाणूचे 43 रुग्ण आढळले म्हणूनच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने खबरदारी म्हणून हे पाऊल उचलले आहे. वाचा-कोरोनामुळे ठाकरे सरकार करणार IPL रद्द? ‘या’ दिवशी होणार फैसला दक्षिण आफ्रिकेचा संघ- क्‍व‍िंटन डिकॉक, तेंबा बावुमा, रासी वान डेर दुसां, फाफ डुप्लेसी, काइले वेरेन, हेनरिक क्‍लासेन, डेविड मिलर, जॉन जॉन स्‍मट्स, एंडिले फेलुकवायो, लुंगी एन्गिडी, लुथो सिपामला, ब्‍यूरेन हॅड्र‍िक्‍स, एनरिच नार्ट्जे, जॉर्ज लिंडे आणि केशव महाराज भारताचा एकदिवसीय क्रिकेट संघ - विराट कोहली, शिखर धवन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.
First published:

Tags: Corona, Cricket

पुढील बातम्या