जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : IPL मध्ये धोनी धमाकेदार कमबॅकच्या तयारीत, एयरपोर्टवर चाहत्यांनी केलं जंगी स्वागत

VIDEO : IPL मध्ये धोनी धमाकेदार कमबॅकच्या तयारीत, एयरपोर्टवर चाहत्यांनी केलं जंगी स्वागत

VIDEO : IPL मध्ये धोनी धमाकेदार कमबॅकच्या तयारीत, एयरपोर्टवर चाहत्यांनी केलं जंगी स्वागत

धोनीच्या फॅन्सासाठी गूड न्यूज आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामात धोनी कमबॅक करतो आहे. चेन्नई सुपर किंगच्या कॅम्पसाठी माही एअरपोर्टवर पोहचला त्यावेळी त्याचं जंगी स्वागत करण्याच आलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 मार्च: महेंद्रसिंह धोनी बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. त्यामुळे कॅप्टन कूल क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू होती. धोनीचे चाहते तर त्याच्या कमबॅककडे डोळे लावून होते. आता धोनीच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण धोनी IPL मधून पुन्हा येत आहे. 29 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये धोनी खेळताना पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंगच्या कॅम्पसाठी धोनी चेन्नईला पोहचला आहे. एअरपोर्टवर माहीचं त्याच्या चाहत्यांनी जंगी स्वागत केलं आहे.धोनी आता आयपीएलचा सराव करताना पाहायला मिळणार आहे.

जाहिरात

धोनीनं चेन्नईला जाण्याआधी नवा हेअर कट केला आहे. त्यानं खास दोस्त आणि हेयर स्टाइलिस्ट सपना भावनानीची भेट घेतली. विशेष म्हणजे माहीनं कमबॅक करताना हा नवा हेअर कट केला आहे. धोनी त्यांच्या हेअर कटमुळे कायमचं चर्चेत असतो. आता तर त्यानं नवा हेयर कट केल्यानं त्याच्या धमाकेदार कमबॅकची चर्चा आहे.धोनीच्या कमबॅकवर त्याच्या मित्रानं ट्विट केल आहे. ‘दोस्ता, तुला आयपीएलमध्ये खेळताना पाहून खुप आनंद होईल. आम्ही चेन्नईला येतो आहे.’चेन्नई सुपर किंगचा 2 आठवडे सराव चालणार आहे. त्यानंतर 4-5  दिवसांची सुट्टी घेवून धोनी आयपीएल टीममध्ये सहभागी होईल. चेन्नईच्या टीमचं नेतृत्व करण्यासाठी कॅप्टन कूल कसून सराव करतो आहे.

चेन्नई सुपर किंगच्या कॅममध्ये अंबाती रायडू, मोनू सिंह, पियूष चावला, सुरेश रैना सहभागी झाले आहेत. धोनी आपल्या टीमसोबत सराव करताना दिसला. धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दोन वेळा विश्वचषक आणणाऱ्या टीमचं नेतृत्व धोनीनं केलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकानंतर आता धोनी कमबॅक करतो आहे. इतर बातम्या न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचा व्हाइट वॉश, कसोटी वर्ल्ड कपची वाट खडतर ‘तू टीम इंडियात खेळशील’, रोहित शर्माने क्रिकेटपटूला केला मेसेज

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात