मुंबई, 02 मार्च : टीम इंडियात स्थान मिळवायचं असेल तर धावांचा पाऊसा पाडा, मोठी खेळी करा आणि संघाला सामना जिंकून द्यावा लागतो. त्यानंतर संघात तुमच्यासाठी दार उघडलं जातं. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये असा एक फलंदाज आहे जो हे सगळं करत असूनही संघात स्थान मिळवू शकलेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून सुर्यकुमार यादव फलंदाजीमुळे चर्चेत आहे. सध्या तो डीवाय पाटील टी20 स्पर्धेत बीपीसीएलकडून खेळत आहे. यात त्यानं सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार मारले आहे. 4 पैकी 3 सामन्यात सुर्यकुमार यादवने शतकी खेळी केली. यात त्याने एकूण 414 धावा केल्या. यानंतरही संघात संधी मिळत नसल्याचं त्यानं माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राशी बोलताना सांगितलं. सुर्यकुमार यादवने आकाश चोप्राशी बोलताना म्हटलं की,‘मी जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट असते की इतक्या धावा करूनही मला संधी का मिळत नाही. पण मी पुन्हा विचार करतो की हे माझ्या हातात नाही. मी बॅटने उत्तर देईन. निवड समितीचा दरवाजा ठोठावणार नाही तर त्याला तोडण्याचा प्रयत्न करेन.’ आकाश चोप्राने प्रश्न विचारला की, ‘कधी असं वाटतं का की संधी मिळणारच नाही?’ यावर उत्तर देताना सुर्यकुमार म्हणाला की, कधी कधी घरी जातो तेव्हा वाटतं की माझी वेळ कधी येईल माहिती नाही. कधी कधी नकारात्मक भावना येतात आणि आता थांबवावं असं वाटतं पण पुन्हा घरच्यांची आणि मित्रांची आठवण होते. जे मला मदत करतात त्यांच्यामुळे पुन्हा नव्याने सुरुवात करतो.’
सुर्यकुमार यादवनं सांगितलं की, रोहित शर्माने मला मेसेज पाठवला होता. तो म्हणला होता की चांगला खेळत आहेस आणि असाच खेळत रहा. तू टीम इंडियात येणार आहेस. रोहित शर्माने चहलसोबत बोलताना म्हटलं होतं की, सुर्यकुमार खूप धावा काढत आहे. त्या मुलाखतीनंतर रोहितने मला मेसेज केला होता. हे वाचा : जरा जास्तच झालं! क्रिकेटमधून धावबाद बंद करण्याची टी20 वर्ल्ड कपमध्ये मागणी कधी कधी मला निवड समितीचे सदस्य सामन्यावेळी भेटतात. ते म्हणतात की अशाच धावा करत रहा. तु चांगला खेळत आहेस. पण मी त्यांना कधीच मला संधी कधी देणार असं विचारलं नसल्याचं सुर्यकुमार यादवने सांगितलं. सध्याच्या संघात सुर्यकुमार यादवला संधी मिळेल की नाही हे सांगणं कठीण आहे. मात्र टी20 वर्ल्ड कपच्या संघात त्याची वर्णी लागू शकते. मधल्या फळीत खेळणाऱ्या सुर्यकुमारमध्ये सामना फिरवण्याची ताकद आहे. डीवाय पाटील टी20 स्पर्धेत त्यानं सर्वाधिक 25 चौकार आणि 36 षटकार मारले आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी 143 होती. या धावा सुर्यकुमारने फक्त 63 चेंडूत केल्या होत्या. त्यामुळे आता त्याला संघात कधी स्थान मिळेल याकडेच लक्ष लागले आहे. हे वाचा : ‘विराटला चुकताना पाहण्यात मजा आली’, गोलंदाजाने कोहलीच्या जखमेवर चोळलं मीठ

)







