Home /News /sport /

न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचा व्हाइट वॉश, कसोटी वर्ल्ड कपची वाट खडतर

न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचा व्हाइट वॉश, कसोटी वर्ल्ड कपची वाट खडतर

न्यूझीलंडविरुद्ध टी20 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडियावर एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत पराभवाची नामुष्की ओढावली.

    नवी दिल्ली, 02 मार्च : भारतीय क्रिकेट संघाची न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात टी20 मालिकेने झाली होती. भारताने टी20 मालिका 5-0 ने जिंकून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. पण त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत यजमानांनी बाजी मारली. भारताला एकाही सामन्यात विजयाची संधी दिली नाही. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारताने 2-0 ने गमावली. गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या कसोटी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये याचा भारताच्या कामगिरीवर परिणाम होणार आहे. न्यूझीलंडने मालिका जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. सध्या या गुणतक्त्यात भारतीय संघ 360 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. मात्र या पराभवामुळे कसोटी वर्ल्ड कप जिंकणं सोप भारताला सोपं नाही. आतापर्यंत भारताने कसोटी वर्ल्ड कपमध्ये 9 सामने खेळले आहेत. यात विंडिजला त्यांच्याच मैदानात 2-0 ने पराभूत केलं. त्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या आफ्रिकेला 3-0 ने तर बांगलादेशला 2-0 ने पराभूत केलं. मात्र देशाबाहेर न्यूझीलंडमध्ये भारतावर व्हाइट वॉशची नामुष्की ओढावली. न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. चार कसोटी सामन्यांची ही मालिका असणार आहे. त्यानंतर पुढच्याी वर्षी जानेवारीमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका इंग्लंडविरुद्ध होणार आहे. हे दोन्ही प्रतिस्पर्धी तुल्यबळ आहेत. त्यामुळे कसोटी वर्ल्ड कपची वाट खडतर अशीच आहे. टेस्ट चॅम्पियनशिप कोण कितव्या स्थानी? आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात भारतीय संघांने 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत. यात 360 गुणांसह टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाने 296 गुण मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 10 कसोटी खेळल्या असून त्यातील 7 मध्ये विजय मिळवला आहे. तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडने झेप घेतली आहे. सात पैकी 3 मध्ये विजय मिळवलेल्या न्यूझीलंडचे 180 गुण झाले आहेत. चौथ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडचे 146 गुण झाले आहेत. इंग्लंडने 9 कसोटी खेळल्या असून त्यापैकी 5 मध्ये विजय तर तीनमध्ये पराभव पत्करावा लागला होता. पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानावर तर लंकेचा संघ सहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघाचे गुण अनुक्रमे 140 आणि 80 इतके झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेला 7 पैकी एका कसोटीत विजय मिळवता आला असून त्यांचे फक्त 24 गुण झाले आहेत. विंडिज आणि बांगलादेशला अद्याप खातंही उघडता आलेलं नाही. टेस्ट चॅम्पियनशिपचे नियम टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत आयसीसी क्रमवारीत असलेल्या टॉप 9 संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यात संघ आपले प्रतिस्पर्धी संघ स्वतः निवडतील. संघांना दोन कसोटी सामने खेळणे अनिवार्य आहे. यात तीन मालिका घरच्या मैदानावर होणार आहेत. मालिका 2 ते 5 सामन्यांची असू शकते. यात प्रत्येक सामन्यात जिंकणाऱ्या संघाला 120 गुण मिळणार आहेत. हे वाचा : 'तू टीम इंडियात खेळशील', रोहित शर्माने क्रिकेटपटूला केला मेसेज दरम्यान गुण हे प्रत्येक सामन्यावर दिले जातील, मालिकेवर असणार नाही. सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 20-20 गुण, तर बरोबरीत सुटल्यास प्रत्येकी 30-30 गुण दिले जातील. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयी संघाला 40 गुण मिळतील. अनिर्णित व बरोबरीच्या निकालांसाठी दोन्ही संघांना प्रत्येकी अनुक्रमे 13.3 व 20 गुण दिले जातील. 4 सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 30 गुण घेईल, तर अनिर्णित निकालासाठी 10 व बरोबरीच्या निकालासाठी 15 गुण मिळतील. पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 24, अनिर्णित निकाल 8 आणि बरोबरीच्या निकालासाठी 12 गुण मिळतील. 2021 मध्ये अंतिम सामना चॅम्पियनशिपच्या अखेरच्या टप्प्यात ज्या दोन संघांचे सर्वाधिक गुण असतील त्यांच्यात जून 2021 मध्ये इंग्लंडमध्ये अंतिम सामना होईल. यात जिंकणारा संघा क्रिकेटच्या इतिहासात पहिला कसोटी वर्ल्ड कप विजेता ठरेल. हे वाचा : जरा जास्तच झालं! क्रिकेटमधून धावबाद बंद करण्याची टी20 वर्ल्ड कपमध्ये मागणी
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket, Test cricket

    पुढील बातम्या