चाहत्यांसाठी मोठी बातमी! धोनी बांगलादेशात करणार कमबॅक?

चाहत्यांसाठी मोठी बातमी! धोनी बांगलादेशात करणार कमबॅक?

भारताकडून नाही तर धोनी करणार बांगलादेशात कमबॅक, काय आहे कारण?

  • Share this:

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या कमबॅककडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अखेर धोनीच्या कमबॅकची तारिख ठरली आहे. धोनीनं इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019मध्ये न्यूझीलंड विरोधात अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि आता पुन्हा विडींज विरोधात होणाऱ्या मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, धोनी आता मार्चमध्ये क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो. मात्र धोनी टीम इंडियाकडून नाही तर बांगलादेशमधून क्रिकेट खेळणार आहे. इंडिया टूडेनं दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयकडे सात खेळाडूंची मागणी केली आहे. हे खेळाडू आशियाई इलेव्हन संघाकडून रेस्ट ऑफ वर्ल्ड संघाविरोधात 2 टी-20 सामने खेळतील. हे दोन्ही सामने पुढच्या वर्षी 18 आणि 21 मार्चला होणार आहे. या बातमीनुसार टीम इंडियापासून तीन महिने लांब असलेल्या धोनीचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं बीसीसीआयनं परवानगी दिल्यास धोनी बांगलादेशमधून क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो. बांगलादेशच्या वतीनं बीसीसीआयकडे महेंद्रसिंग धोनीबरोबरच, कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांची मागणी केली आहे.

वाचा-पराभव लागला जिव्हारी! बांगलादेशने BCCIकडे मागितले धोनीसह टीम इंडियाचे 6 खेळाडू

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयला पाठवला प्रस्ताव

बांगलादेशनं बीसीसीआयला एक प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये धोनीसह सात खेळाडूंच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. धोनीनं वर्ल्ड कपनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष निजामुद्दीन चौधरी यांनी, बांगलादेशमध्ये आशिया इलेव्हन आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड यांच्यात टी-20 सामने होणार आहेत. त्यासाठी बीसीसीआयकडून सात खेळाडूंना या सामन्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. बीसीसीआयबरोबरच इतर बोर्डकडेही खेळाडूंसाठी मागणी केली जाणार आहे, असे सांगितले.

वाचा-भारत-वेस्ट इंडिज मालिकेत मोठा बदल, खेळाडूंवर वॉच ठेवण्यासाठी असणार ‘तिसरा डोळा’

धोनी करू शकतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन

जर बीसीसीआयनं या प्रस्तावाला मान्यता दिली तर, धोनी या दोन सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. त्यामुळं धोनीच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बाब असणार आहे. याआधी धोनी वेस्ट इंडिज मालिकेत पुनरागमन करू शकतो असे वाटले होते, मात्र धोनीला या मालिकेतही विश्रांती देण्यात आली. धोनी, आयपीएलच्या पुढच्या हंगामात नक्कीच पुनरागमन करू शकतो. दरम्यान धोनी पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कपही खेळू शकतो.

वाचा-कॅप्टन कोहलीचा स्वॅग! आयोजकांकडून हिसकावला पुरस्कार, VIDEO VIRAL

First published: November 26, 2019, 2:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading