मुंबई, 25 नोव्हेंबर : आयसीसीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाद कमी करण्यासाठी नवे नियम लागू करण्यात येत आहे. यात क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वाद हे नो बॉलवरून होतात. त्यामुळं या वादावर तोडगा म्हणून नियम आणला आहे. आयसीसीच्या वतीनं हा नियम ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यात झालेल्या राड्यामुळं घेण्यात आला. ऑस्ट्रेलिया-पाक यांच्यातील सामन्यात तब्बल 4 नो बॉलकडे पंचांनी दुर्लक्ष केले. त्यामुळं आता भारत-वेस्ट इंडिज मालिकेत मोठा बदल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचाच्या चुकांना टाळण्यासाठी आता फ्रंट फूट नो-बॉलवर लक्ष ठेवण्यासाठी आणखी एका पंचाची मदत घेतली जाणार आहे. बराच वेळा मैदानावरील पंचांकडून फ्रंट फूट नो-बॉल पाहताना चूक होते. त्यामुळं आता आयसीसीच्या वतीनं टीव्ही पंचांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयसीसीच्या वतीनं सध्या टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळं 6 डिसेंबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत टीव्ही पंच असणार आहेत. वाचा- द्विशतकी खेळीनंतरही विराटने केले संघाबाहेर! नाराज संजू सॅमसनने दिली प्रतिक्रिया फ्रंट फूट नो-बॉल पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. त्यानंतर मैदानावरील पंच अंतिम निर्णय घेतील. हा नियम भारत-वेस्ट इंडिज मालिकेत लागू केला जाणार आहे. याआधी इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात तिसऱ्या पंचांनी सराव म्हणून हॉकआय ऑपरेटरची मदत घेण्यात आली होती. वाचा- 37 वर्षांच्या स्टार गोलंदाजासाठी बायको शोधणे आहे! भज्जीनं घेतला पुढाकार रिकी पॉटिंगने केली आयसीसीवर टीका पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात पंचांनी केलेल्या चुकांवर रिकी पॉटिंगने आयसीसीवर टीका केली आहे. तसेच, आयसीसीच्या टीव्ही पंचांच्या कल्पनेवर, “जर खेळताना व्हिडीओ फुटेज काढले तर तुम्हाला कळतं की बॉलची लाईन काय होती. त्यामुळं निर्णय घेण्यास मदत होते. यामुळे मैदानावरील पंच चिंतेत नसतात.परिणामी त्यांचे पूर्ण लक्ष हे फलंदाज आणि क्षेत्ररक्षणाकडे असता. त्यामुळं मी या निर्णयाचे स्वागत करतो”, असे सांगितले. वाचा- जीवघेणा चेंडू! स्वत:ला वाचवण्यासाठी मैदानातच बसला आंद्रे रसेल, पाहा VIDEO असा आहे भारत-वेस्ट इंडिज दौरा 6 डिसेंबर 2019 - पहिला T20I, मुंबई 8 डिसेंबर 2019 - दुसरा T20I, तिरुवनंतपुरम 11 डिसेंबर 2019 - तिसरा T20I, हैदराबाद 15 डिसेंबर 2019 - पहिला ODI, चेन्नई 18 डिसेंबर 2019 - दुसरा ODI, विशाखापत्तनम 22 डिसेंबर 2019 - तिसरा ODI, कटक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







