कोलकाता, 25 नोव्हेंबर : बांगलादेश संघासाठी भारतीय दौरा विशेष खास नव्हता. टी-20 मालिकेत परभवाचा सामना करावा लागल्यानंतर टीम इंडियानं 2 कसोटी सामन्यातही बांगलादेशला क्लिन स्विप दिला. दोन्ही कसोटी सामन्यात बांगलादेशला लाजीरवाणा पराभव सहन करावा लागला. ऐतिहासिक डे-नाईट सामन्यातही भारताचेच वर्चस्व राहिले. एकाही दिवशी बांगलादेशच्या संघाला टीम इंडियाला टक्कर देता आली नाही. त्यामुळं दोन्ही सामना तिसऱ्या दिवशीच संपले. हा पराभव जिव्हारी लागल्यानंतर बांगलादेशच्या संघानं बीसीसीआयकडे एक भलतीच मागणी केली आहे. बांगलादेशनं टीम इंडियातील सात खेळाडू मागितले आहेत. इंडिया टूडेनं दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयकडे सात खेळाडूंची मागणी केली आहे. हे खेळाडू आशियाई इलेव्हन संघाकडून रेस्ट ऑफ वर्ल्ड संघाविरोधात 2 टी-20 सामने खेळतील. हे दोन्ही सामने पुढच्या वर्षी 18 आणि 21 मार्चला होणार आहे. या बातमीनुसार टीम इंडियापासून तीन महिने लांब असलेल्या धोनीचाही समावेश करण्यात आला आहे. वाचा- भारत-वेस्ट इंडिज मालिकेत मोठा बदल, खेळाडूंवर वॉच ठेवण्यासाठी असणार ‘तिसरा डोळा’ बांगलादेशच्या वतीनं बीसीसीआयकडे महेंद्रसिंग धोनीबरोबरच, कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांची मागणी केली आहे. वाचा- कॅप्टन कोहलीचा स्वॅग! आयोजकांकडून हिसकावला पुरस्कार, VIDEO VIRAL बांगलादेश क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयला पाठवला प्रस्ताव बांगलादेशनं बीसीसीआयला एक प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये धोनीसह सात खेळाडूंच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. धोनीनं वर्ल्ड कपनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष निजामुद्दीन चौधरी यांनी, बांगलादेशमध्ये आशिया इलेव्हन आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड यांच्यात टी-20 सामने होणार आहेत. त्यासाठी बीसीसीआयकडून सात खेळाडूंना या सामन्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. बीसीसीआयबरोबरच इतर बोर्डकडेही खेळाडूंसाठी मागणी केली जाणार आहे, असे सांगितले. वाचा- 37 वर्षांच्या स्टार गोलंदाजासाठी बायको शोधणे आहे! भज्जीनं घेतला पुढाकार धोनी करू शकतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन जर बीसीसीआयनं या प्रस्तावाला मान्यता दिली तर, धोनी या दोन सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. त्यामुळं धोनीच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बाब असणार आहे. याआधी धोनी वेस्ट इंडिज मालिकेत पुनरागमन करू शकतो असे वाटले होते, मात्र धोनीला या मालिकेतही विश्रांती देण्यात आली. धोनी, आयपीएलच्या पुढच्या हंगामात नक्कीच पुनरागमन करू शकतो. दरम्यान धोनी पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कपही खेळू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







