जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कॅप्टन कोहलीचा स्वॅग! आयोजकांकडून हिसकावला पुरस्कार, VIDEO VIRAL

कॅप्टन कोहलीचा स्वॅग! आयोजकांकडून हिसकावला पुरस्कार, VIDEO VIRAL

कॅप्टन कोहलीचा स्वॅग! आयोजकांकडून हिसकावला पुरस्कार, VIDEO VIRAL

विराट कोहलीचा असा स्वॅग तुम्ही कधीच पाहिला नसेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 25 नोव्हेंबर : भारतीय संघानं बांदलादेशला टी-20 आणि कसोटी मालिका नमवले. यात कोलकातामध्ये झालेल्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशवर एक डाव आणि 46 धावांनी जबरदस्त विजय मिळवला. पहिल्यांदाच भारतात होत असलेल्या या सामन्यात विजय मिळवत कर्णधार कोहलीनं अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. भारतानं विजय मिळवलेल्या ऐतिहासिक सामन्यात विराटनं रेकॉर्ड ब्रेक खेळी केली. विराटच्या 136 धावांच्या खेळीवर भारतानं हा सोपा विजय मिळवला. विराटच्या या खेळीसाठी सामन्यानंतर त्याला एक विशेष पुरस्कार देण्यात आला. मात्र हा पुरस्कार स्वीकारतांना विराटला हसू आवरले नाही, कारण प्रकारचं असा काहीसा घडला. विराटचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- 37 वर्षांच्या स्टार गोलंदाजासाठी बायको शोधणे आहे! भज्जीनं घेतला पुढाकार जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज विराट कोहली फक्त आपल्या फलंदाजीसाठी नाही तर मस्करीसाठीही ओळखला जातो. मैदानावर डान्स करणारा किंवा मस्करी करणारा विराट आपण पाहिला असेल मात्र आता त्यानं चक्क आयोजकांकडून पुरस्कारही हिसकावून घेतला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, विराट स्वत: हसताना दिसत आहे. विराटला 136 धावांच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. दरम्यान कोहली जेव्हा हा पुरस्कार स्वीकारत होता, तेव्हा आयोजकांनी विसरून ट्रॉफी दिलीच नाही. त्यावर विराटनं त्यांची मस्करी करत, त्यांच्याकडून पुरस्कार हिसकावून घेतला. त्यानंतर विराटच जोर जोरात हसायला लागला. वाचा- कसा बनतो पास्ता माहित आहे का? पाहा हा TikTokवर व्हायरल झालेला VIDEO

जाहिरात

कोलकाता कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये विराटनं आपले 27 शतक पूर्ण केले. तर, कर्णधार म्हणून हे त्याचे 20वे शतक होते. याचबरोबर विराटनं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पॉंटिंगच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. याशिवाय भारतीय संघानं सलग 7 कसोटी सामन्यांचा विक्रमही केला आहे. आता भारतीय संघ पुढची कसोटी मालिका 2020मध्ये न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे. वाचा- आता सापडली रानू मंडलची कार्बन कॉपी, सोशल मीडियावर गाण्याचा VIDEO VIRAL दरम्यान, बांगलादेश संघाला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ 6 डिसेंबरपासून वेस्ट इंडिज विरोधात टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बांगलादेश विरोधात टी-20 मालिकेत विश्रांती घेतलेला विराट कोहली या मालिकेत पुनरागमन करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात