'विराट आणि धोनीने साथ दिली असती तर...', युवराज सिंगने पहिल्यांदाच व्यक्त केली नाराजी

'विराट आणि धोनीने साथ दिली असती तर...', युवराज सिंगने पहिल्यांदाच व्यक्त केली नाराजी

17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या युवीने आपला सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण आहे हे सांगितले.

  • Share this:

मुंबई, 01 एप्रिल : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग युवराज सिंग आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. युवराजने 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या युवीने आपला सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण असल्याचे सांगितले. 38 वर्षीय युवराजने माझ्यासाठी सौरव गांगुलीच बेस्ट असल्याचे मत व्यक्त केले.

डावखुरा फलंदाज युवराज सिंगने नुकत्याच एका मुलाखतीत, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली कर्णधार म्हणून कायम लक्षात राहतो. 2011च्या विश्वचषकात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात युवराज 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' होता. मात्र धोनीपेक्षा गांगुली युवीचा आवडता कर्णधार आहे.

वाचा-IPLबाबात सर्वात मोठी बातमी, एप्रिल नाही तर 'या' महिन्यांत होणार स्पर्धा

स्पोर्टस्टारला दिलेल्या मुलाखती दरम्यान माजी भारतीय अष्टपैलू खेळाडूने, "मी गांगुलीच्या नेतृत्वात खेळलो आहे आणि त्याने मला खूप आधार दिला. माझ्याकडे सौरवच्या कर्णधारपदाच्या आठवणी आहेत कारण त्याने मला साथ दिली. मला माही आणि विराटकडून तेवढी साथ मिळाली नाही", असे सांगितले.

वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले हिटमॅनचे आभार, म्हणाले Thank You रोहित

युवराजने वनडे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 14 शतके केली आहेत. युवीने 304 एकदिवसीय सामन्यात 8701 धावा केल्या. त्याने सर्वात कठीण गोलंदाज म्हणून श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनची निवड केली. युवराज म्हणाला, 'मला मुरलीधरनविरुद्ध खूप संघर्ष करावा लागला. त्याला त्याची गोलंदाजी समजू शकली नाही. त्यानंतर सचिनने मला त्याच्या विरोधात स्वीप सुरू करण्यास सांगितले. युवराजसिंग कठीण परिस्थितीत चमकदार कामगिरीसाठी आजही ओळखला जातो.

वाचा-IPL 2020 होणार रद्द, पुढच्या वर्षी होणार नाही दिग्गज खेळाडूंचा लिलाव-रिपोर्ट

युवराजने 2019 मध्ये सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. युवराज भारताच्या दोन विश्व चँपियन (2007 मधील टी -20 आणि 2011 मधील विश्वचषक) संघात सहभागी होता आणि दोन्ही स्पर्धांमध्ये त्याने केलेल्या कामगिरीने त्याने एक विशेष छाप सोडली.

First published: April 1, 2020, 10:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading