मुंबई, 28 नोव्हेंबर: येत्या 23 डिसेंबरला आयपीएलच्या आगामी मोसमासाठी मिनी ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनसाठी आतापर्यंत अनेक खेळाडूंनी आपलं नाव रजिस्टर केलेलं आहे. मिनी ऑक्शनसाठी फ्रँचायझींनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. 15 नोव्हेंबरला दहाही फ्रँचायझींनी रिटेन खेळाडूंची नावं जाहीर केली होती. सध्या खेळाडूंच्या रजिस्ट्रेशनचं काम सुरु असून ऑक्शनआधी एका ऑस्ट्रेलियन खेळाडूनं नुकतंच आपलं नाव रजिस्टर केलं आहे. हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे ऑल राउंडर कॅमेरॉन ग्रीन.
कॅमेरॉन ग्रीनचं रजिस्ट्रेशन
ग्रीननं आज अधिकृतपणे आयपीएलसाठी आपलं नाव नोंदवलं आहे. त्यानं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय, अनेकांकडून मी आयपीएलविषयी ऐकलं आहे. आयपीएलची नेहमीच त्यांच्याकडून प्रशंसा होते. तिथे असणाऱ्या प्रशिक्षकांचीही प्रशंसा ते करतात. आयपीएलमध्ये प्रत्येकजण आपल्या कामात ग्रेट असतो.'
Cameron has put talk of an IPL opportunity out of his mind and instead focused on retraining his brain for the Test summer #AUSvWI | @LouisDBCameronhttps://t.co/skjLqVj7KB
— cricket.com.au (@cricketcomau) November 27, 2022
ग्रीनला मिळणार कोट्यवधींची बोली?
टी20 वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी झालेल्या टी20 मालिकेत ग्रीननं तुफान फटकेबाजी केली होती. कॅप्टन फिंचसह त्यानं सलामीला बॅटिंग केली होती. तीन टी20 सामन्यात त्यानं दोन अर्धशतकं ठोकली होती. बॉलिंगमध्येही त्यानं चांगलं योगदान दिलं होतं. त्यामुळे त्याच्यावर फ्रँचायझींची खास नजर राहील. काही दिवसांपूर्वी रवी शास्त्रींनी ग्रीनला 10 कोटींपर्यंत बोली लागू शकते असं म्हटलं होतं.
हेही वाचा - Vijay Hajare Trophy: कोण आहे तो बॉलर ज्याला ऋतुराजनं ठोकले 7 सिक्स? 'या' खास अॅक्शनमुळे झाली होती चर्चा...
आयपीएलआधी व्यस्त वेळापत्रक
दरम्यान आयपीएलआधी ऑस्ट्रेलियाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडर भरगच्च आहे. ग्रीन देखील ऑस्ट्रेलियाच्या टीमचा सध्या महत्वाचा भाग आहे त्यामुळे आगामी मालिकांमध्ये त्याला खेळावं लागणार आहे. 2023 च्या आयपीएलआधी ग्रीन वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात कसोटी मालिकेत खेळणार आहे. त्यानंतर जानेवारीत ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर असणार आहे. दरम्यान बिग बॅश लीगमध्येही ग्रीन पर्थ स्कॉचर्स संघाकडून खेळेल. आयपीएल संपताच ऑस्ट्रेलिया अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाईल. अशा प्रकारे भरगच्च कार्यक्रम असल्यानं ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनही ग्रीनला आयपीएलमध्ये खेळण्यारपूर्वी सतर्क केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports