नवी दिल्ली, 01 जून : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां आपल्या वक्तव्यांमुळं चर्चेत असते. याआधी तिनं शमीवर वाईट आरोप करत घटस्फोटाची मागणी केली होती. आता मात्र ती एक न्यूड फोटोमुळं चर्चेत आली आहे. हसीन जहांनं इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे. दरम्यान या फोटोमधील दुसरी व्यक्ती शमीच असल्याचं म्हटलं जात असलं तरी, याबाबत ठोस माहिती नाही. मात्र हा फोटो अपलोड केल्याबद्दल शमीच्या चाहत्यांनी मात्र हसीनला ट्रोल केलं आहे. हसीननं शेअर केलेल्या या फोटोवर शमीसाठी एक मेसेजही लिहिला आहे. यात तिनं लिहिलं आहे की, काल तू काहीच नव्हतोस, तेव्हा मी पाक होती, आज तू काहीतरी आहे तर मी नापाक झाले. खोटे बोलून सत्य कधीही लपत नाही. खोट्या अश्रुंवर किती दिवस जगणार? यासह तिनं क्रिकेटर शमी अहमदसह, असे लिहिले आहे. यावरून तिच्यासोबत असलेली व्यक्ती शमीच असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाचा- खास मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडलाय ‘हा’ दिग्गज क्रिकेटर
वाचा- जानेवारीत झाला होता हार्दिक पांड्याचा साखरपुडा; लहानग्या पाहुण्याची दिली News शमी आणि हसीन गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहत होते. हसीन जहां आणि मोहम्मद शमी यांच्यात अनेक वाद होते. हसीन जहांने शमीवर फसवणूकीसह अनेक गंभीर आरोप केले होते. एवढेच नाही तर शमीवर तुरुंगात जाण्याचीही वेळ आली होती. तेव्हापासून हे जोडपं वेगळे राहत आहेत. त्यांना एक मुलगीही आहे.
वाचा- भारतीय खेळाडूचा धक्कादायक खुलासा, लग्नानंतरही सोबत आहेत 5 गर्लफ्रेण्ड कारण… यापूर्वी हसीनने इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. रमजान महिन्यात तिनं एक व्हिडीओ शेअर केल्यामुळं हसीनला ट्रोलही करण्यात आलं होतं.

)







