नवी दिल्ली, 20 मे : कोरोनामुळं सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा भारतात जाहीर करण्यात आला आहे. परिणामी सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेली आयपीएल ही स्पर्धाही कोरोनामुळं स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळं सध्या सर्व खेळाडू आपल्या घरांमध्ये कैद आहे. आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळाडू संवाद साधत असतात. अशाच एक भारतीय संघाच्या स्टार खेळाडूनं एका लाईव्ह चॅटमध्ये धक्कादायक खुलासा केला. भारतीय संघाचा स्टार फलंदाज मनीष पांडेनं लग्नानंतरही त्याच्या 5 गर्लफ्रेण्ड असल्याचा खुलासा केला आहे. मनीष पांडेनं मस्करी करत आपल्या बॅगमध्ये 5 गर्लफ्रेण्ड कायम असतात, असे सांगितले. मनीष पांडेनं आपल्या बॅटची तुलना गर्लफ्रेण्डशी केली आहे. कर्नाटकच्या हा क्रिकेटपटू आपल्या बॅटना प्रेयसीप्रमाणं जपून ठेवतो. त्यांच्याशी प्रेमानं वागतो. मनीषनं सांगितले की, खरं प्रेम तो पत्नी अश्रिता शेट्टीशीच करतो, पण बॅटही त्याचं सर्वस्व आहे. डिसेंबर 2019मध्ये मनीष पांडेचा मुंबईमध्ये अभिनेश्री अश्रिता शेट्टीशी विवाह झाला होता.
भारताकडून 26 एकदिवसीय आणि 38 टी-20 सामने खेळलेल्या मनीषनं सांगितले की जेव्हा चेंडू बॅटच्या टोकाला लागतो तेव्हा तो आपल्या बॅटशी भांडतो. तसेच, मनीषच्या 5 आवडत्या बॅट असून, त्या सगळ्या त्याच्या आवडत्या आहेत. मनीषने असेही सांगितले की, जेव्हा जेव्हा तो निराश होतो तेव्हा तेव्हा तो आपल्या बॅटला घेऊन बसतो.
…म्हणून बॅटशी भांडतो पांडे क्रिकबझच्या कार्यक्रमात मनीष पांडेनं सांगितले की, त्याच्या बॅट या गर्लफ्रेंडप्रमाणे आहेत. खासकरुन जेव्हा तो सामना खेळत असतो आणि त्याची पत्नी जवळपास नसते. तेव्हा तो आपल्या बॅटशी भांडतो. त्यांच्या बॅटशीही भांडतात. एवढेच नाही तर प्रसंगाप्रमाणे तो आपल्या या खास मैत्रीणींशी गप्पा मारतो. गेल्या वर्षी 2019 च्या विश्वचषकानंतर मनीष पांडेच्या संघाने भारतात स्थान मिळवले. परंतु, त्यांना अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. न्यूझीलंड दौऱ्यात तो टीम इंडियाच्या टी-20 आणि एकदिवसीय संघाचादेखील भाग होता.