जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / जानेवारीत झाला होता हार्दिक पांड्याचा साखरपुडा, आता शेअर केली लहानग्या पाहुण्याची Good News

जानेवारीत झाला होता हार्दिक पांड्याचा साखरपुडा, आता शेअर केली लहानग्या पाहुण्याची Good News

जानेवारीत झाला होता हार्दिक पांड्याचा साखरपुडा, आता शेअर केली लहानग्या पाहुण्याची Good News

अभिनेत्री नताशा आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांनी शेअर केलेल्या या बातमीमुळे त्यांचे चाहते चकीत झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 मे : बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्यामुळे बरीच चर्चेत आहे. जानेवारीत अभिनेत्रीने क्रिकेटर हार्दिक पांड्याशी साखरपुडा करुन सर्वांना चकित केले होते. या दोघांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ आणि फोटोंबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. आता हार्दिक पांड्या आणि नताशाने एक महत्त्वपूर्ण माहिती जाहीर केली आहे. ती ऐकून अनेक जण चकीत झाले आहेत. लवकरच लहान पाहुणा त्यांच्या घरी येणार असल्याचे हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सांगितले आहे. नताशाने हार्दिक पांड्याबरोबरची काही छायाचित्रे शेअर केली आहेत, त्यातील एका फोटोत नताशाचं बेबी बंपही दिसतं आहे. या दोघांचेही एक छायाचित्र सध्या खूप चर्चेत आहे, ज्यामुळे बराच सिक्रेट निर्माण झाला आहे. या फोटोमध्ये हार्दिक पांड्या आणि नताशा दोघेही पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. दोघेही पूजा करीत असताना दिसत आहेत. फोटोमध्ये हार्दिक आणि नताशा गळ्यात फुलांचा हार आणि भारतीय वेशात आहेत. हा फोटो पाहुन अनेकांनी त्यांच्या लग्नाची शक्यता व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान दोघांनीही लग्न केले आणि याबद्दल कोणालाही माहिती मिळाली नव्हती, असेही म्हटले जात आहे. हार्दिक पांड्या आणि नताशाने सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याची रोमँटिक छायाचित्रे शेअर केली होती आणि दोघांनीही एकमेकांना डेट केल्याची माहिती दिली. त्यानंतर मात्र हे जोडपं अचानक चर्चेत आलं होतं. लॉकडाऊन दरम्यानही दोघे एकमेकांसोबत राहत होते. अशा परिस्थितीत नताशाने प्रेग्नेंट असल्याची बातमी देऊन सर्वांना पुन्हा चकीत केले आहे. हार्दिक आणि नताशाच्या त्या छायाचित्रावर मात्र नेमके लग्नाची होती की इतर दुसऱ्या कार्यक्रमाची ते मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात