नवी दिल्ली, 1 जून: पूर्व ऑस्ट्रेलियाचा स्पिनर शेन वॉर्नबद्दल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. याचं कारणही तेवढच खास आहे. शेन वॉर्नची आता त्याच्याच खास मित्राच्या एक्स गर्लफ्रेंडवर नजर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वॉर्नचा खास मित्र दुसरा तिसरा कोणी नसून माजी कर्णधार मायकेल क्लार्क आहे. वॉर्नसोबत क्लार्कच्या एक्स पत्नीचं नाव जोडलं जात असल्यानं सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. माइकल क्लार्कचं त्याच्या पत्नी कायलीसोबत नुकताच घटस्फोट झाला आणि त्यांनंतर कायलीच्या सगळ्या फोटोंना लाइक करण्याचा सपाटा लावला. वॉर्नने ब्रिटिश अभिनेत्री लिझ हर्लीपासून डीजे एमिली स्कॉटपर्यंतची एक लव्हस्टोरी सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहेच. वॉर्नरचा 2005 साली सायमनशी घटस्फोट झाला. तेव्हापासून तो कायम अफेअरसाठी चर्चेत राहिला आहे. वॉर्नच्या यादीतील पुढचं नाव क्लार्कची पत्नी असल्याचीही चर्चा आहे. 7 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी केला काडीमोड ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क आणि त्यांची पत्नी कायली यांनी लग्नाच्या सात वर्षानंतर एप्रिल 2020 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. या दोघांचे मे 2012 मध्ये लग्न झालं होतं. त्यांना 4 वर्षांची एक मुलगी आहे तिचं नाव केल्सी. हा तलाक जवळपास 285 कोटींचा आहे यामध्ये ते राहात असलेल्या घराचाही समावेश असल्याची माहिती समोर आली होती. 2018 रोजी मायकेल क्लार्क आणि त्याच्या असिस्टंटमध्ये अफेअर असल्याचा चर्चा ऑस्ट्रेलियातील काही माध्यमांमध्ये होत्या. त्यानंतर आता वॉर्न आणि कायली यांची चर्चाही जोरदार सोशल मीडियावर सुरू झाली आहे. दोघांकडूनही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







