मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पराभवानंतर Mithali Raj चे निवृत्तीसंदर्भात मोठे वक्तव्य, म्हणाली....

पराभवानंतर Mithali Raj चे निवृत्तीसंदर्भात मोठे वक्तव्य, म्हणाली....

Mithali Raj

Mithali Raj

न्यूझीलंडमध्ये खेळला जात असलेला आयसीसी महिला विश्वचषक(ICC Womens World Cup 2022) आता अंतिम टप्प्यात आला आहे. परंतु, टीम इंडिया रविवारी 27 मार्च ला या स्पर्धेतून बाहेर पडली. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला दक्षिण अफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. मिताली राजच्या (Mithali Raj ) नेतृत्वातील भारतीय संघाने विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले, पण शेवटी दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली. पराभवानंतर कर्णधार मिताली राजने महत्वाची प्रतिक्रिया देत निवृत्तीसंदर्भात भाष्य केले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 28 मार्च: न्यूझीलंडमध्ये खेळला जात असलेला आयसीसी महिला विश्वचषक(ICC Womens World Cup 2022) आता अंतिम टप्प्यात आला आहे. परंतु, टीम इंडिया रविवारी 27 मार्च ला या स्पर्धेतून बाहेर पडली. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला दक्षिण अफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. मिताली राजच्या (Mithali Raj ) नेतृत्वातील भारतीय संघाने विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले, पण शेवटी दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली. पराभवानंतर कर्णधार मिताली राजने महत्वाची प्रतिक्रिया देत निवृत्तीसंदर्भात भाष्य केले आहे.

दिग्गज क्रिकेट मिताली राजने विश्वचषकापूर्वी निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर तिने तिच्या या निर्णयात बदल केल्याचे समजते. भविष्याचा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ नाही. असे वक्तव्य तिने पराभवानंतर केले आहे.

सहा विश्वचषक खेळलेली एकमेव महिला क्रिकेटपटू मिताली म्हणाली, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात तीन विकेट्सने पराभव पत्करावा लागल्याने ती नाराज झाली आहे.

टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी दिल्लीच्या 'या' खेळाडूची होऊ शकते निवड, रोहितला मिळू शकतो डच्चू

सामन्यानंतर काही तासातच मितालीला तिच्या निवृत्तीविषयी विचारले असता, आज काय झाले हे समजून घेण्यासाठी आणि माझ्या भविष्याचा विचार करण्यासाठी तुम्ही मला एक तासही दिला नाही. असा उलट सवाल उपस्थित करत ती पुढे म्हणाली, जेव्हा तुम्ही सतत मेहनत घेऊन विश्वचषकाची तयारी करत आहात. आणि एक वर्षापेक्षा जास्त आणि तुमची मोहीम अशीच संपली तर खूप निराशाजनक आहे. ते स्वीकारून तिथून पुढे जाण्यासाठी वेळ लागतो. कोणत्याही खेळाडूचे भविष्य काहीही असो, मी माझ्या भविष्याचा विचार केलेला नाही. असे स्पष्ट वक्तव्य मितालीने यावेळी केले.

जेव्हा मी पराभवाच्या नैराश्यातून बाहेर येईन तेव्हाच निवृत्तीबद्दल विचार करेन. तसेच, भारतीय संघाच्या जर्सीतील शेवटचा सामना आहे का? असा सवालही मितालीला यावेळी उपस्थित केला. त्यावर ती म्हणाली, मी सध्या याबद्दल बोलण्याच्या योग्य स्थितीत नाही. माझ्या भविष्याबद्दल आत्ताच भाष्य करणे माझ्यासाठी योग्य नाही. आज आपण ज्याप्रकारे परफॉर्म केले ते पाहता भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. अशी भावना मितालीने यावेळी व्यक्त केली.

मिस्ट्री बॉय Aryan Khan सोबत झळकलेली 'ती' Mystery Girl आहे तरी कोण?

दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती. षटकातील पहिल्या 4 बॉलवर दक्षिण अफ्रिकेने 4 धावा केल्या आणि एक विकेट देखील गमावली. त्यानंतर अफ्रिकी संघाला शेवटच्या 2 चेंडूत 3 धाव करण्याची आवश्यकता होती, तेव्हा मिग्नोन डू प्रिझ (Mignon du Preez) हिने लॉन्ग ऑनच्या दिशेने मोठा फटका खेळला आणि झेल देऊन बसली. भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले.

पण तितक्यात कळले की, गोलंदाज दिप्ती शर्मा (Deepti Sharma) हिच्याकडून एक चूक झाली. दिप्तीने टाकलेला हा चेंडू नो बॉल होता. या एका बॉलमुळे सामन्याची दिशा पूर्णपणे बदलली. ही विकेट मिळाली असती, तर भारतीय संघ विजयी ठरू शकत होता.

First published:

Tags: Mithali raj, Team india