जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ब्रेसवेलनं केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी, अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच फलंदाज

ब्रेसवेलनं केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी, अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच फलंदाज

ब्रेसवेलनं केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी, अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच फलंदाज

न्यूझीलंडला 25 षटकात 240 धावा हव्या होत्या. त्यांचा अर्धा संघ तंबूत परतला होता. अशा वेळी ब्रेसवेल मैदानात उतरला आणि तुफान फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ नेले होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

हैदराबाद, 19 जानेवारी : भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना 12 धावांनी जिंकला असला तरी सध्या चर्चा न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटर मायकल ब्रेसवेलची होत आहे. 350 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला 25 षटकात 240 धावा हव्या होत्या. त्यांचा अर्धा संघ तंबूत परतला होता. अशा वेळी ब्रेसवेल मैदानात उतरला आणि तुफान फटकेबाजी केली. त्याने फक्त 57 चेंडूत शतक केलं. न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान शतक करणाऱ्यांमध्ये तो तिसरा ठऱला. याशिवाय त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 349 धावा केलल्या. गिलशिवाय भारताचे इतर फलंदाज ४० धावांचा आकडाही पार करू शकले नाही. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडचा निम्मा संघ 110 धावात बाद झाला होता. तेव्हा ब्रेसवेल फलंदाजीला आला. कर्णधार टॉम लॅथमसुद्धा लगेच बाद झाला. न्यूझीलंडची अवस्था ६ बाद 131 अशी झाली होती. त्यावेळी भारत सहज सामना जिंकेल अशी परिस्थिती होती. हेही वाचा :  वनडेत द्विशतक झळकावण्यात टीम इंडियाचा दबदबा, 13 वर्षांत 10 पैकी 7 भारतीयांच्या नावावर ब्रेसवेल आणि सँटनर यांनी न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या. दोघांनी 7 व्या गड्यासाठी 162 धावांची भागिदारी केली. एकदिवीस क्रिकेटच्या इतिहासात सातव्या गड्यासाठी ही तिसरी सर्वात मोठी भागिदारी ठरली. 46 व्या षटकात सँटनर आणि त्यानंतर हेन्री बाद झाला. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना ब्रेसवेलची फटकेबाजी सुरूच होती. अखेरच्या षटकात न्यूझीलंडला 20 धावांची गरज होती. ब्रेसवेलने शार्दुलला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून इरादा स्पष्ट केला होता. त्यानंतर दबावात असलेल्या शार्दुलने वाइड चेंडूही टाकला. मात्र त्यापुढच्या चेंडूवर ब्रेसवेल पायचित झाला अन् भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. हेही वाचा :  शुभमनच्या द्विशतकावर भारी पडलं असतं मायकल ब्रेसवेलचं शतक, शार्दुल ठाकुरने वाचवलं ब्रेसवेलनं 12 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 78 चेंडूत १४० धावांची जबरदस्त खेळी केली. 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोणत्याही फलंदाजाने केलेली ही चौथी सर्वोत्तम खेळी ठरली. ब्रेसवेलच्या आधी धोनीच एकमेव असा खेळाडू होता ज्याने वनडे क्रिकेटमध्ये 7 व्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर खेळताना दोन शतके केली आहेत. आता भारताविरुद्ध शतक करत ब्रेसवेलने धोनीच्या या विक्रमाची बरोबरी केली. ब्रेसवेलने भारताआधी आयर्लंडविरुद्ध 2022 मध्ये 127 धावांची नाबाद खेळी केली होती. तर धोनीने 7 व्या क्रमांकावर खेळताना आफ्रिका आणि पाकिस्तान विरुद्ध शतक केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात