मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /शुभमनच्या द्विशतकावर भारी पडलं असतं मायकल ब्रेसवेलचं शतक, शार्दुल ठाकुरने वाचवलं

शुभमनच्या द्विशतकावर भारी पडलं असतं मायकल ब्रेसवेलचं शतक, शार्दुल ठाकुरने वाचवलं

भारत सहज जिंकेल असं वाटत असताना न्यूझीलंडचा फलंदाज मायकेल ब्रेसवेल मैदानावर तुफान फटकेबाजी करत होता. त्याने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला होता. अखेर भारताने बाजी मारत 12 धावांनी विजय मिळवला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

हैदराबाद, 18 जानेवारी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये झाला. यात भारताने अखेरच्या षटकात न्यूझीलंडवर 12 धावांनी विजय मिळवला. 350 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची अवस्था 6 बाद 136 अशी झाली होती. भारत सामना सहज जिंकेल असे वाटत असतानाच मायकल ब्रेसवेलने तुफान खेळी करत वेगवान शतक झळकावलं. त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतलं हे दुसरं शतक होतं.

युवा फलंदाज शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने 50 षटकात 349 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंड मैदानात उतरले तेव्हा त्यांची सुरुवात अडखळत झाली. अर्धा संघ 136 धावात तंबूत परतला असताना तिथून पुढे मायकल ब्रेसवेलने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत वेगाने धावा केल्या. पण अखेरच्या षटकात तो बाद झाला आणि भारताने विजय मिळवला. अखेरच्या षटकात ब्रेसवेल बाद झाला नसता तर त्याचं वेगवान शतक शुभमन गिलच्या द्विशतकी खेळीवर भारी पडलं असतं.

हेही वाचा : INDvsNZ : न्यूझीलंडने अखेरच्या षटकापर्यंत झुंजवले, भारताचा 12 धावांनी विजय

ब्रेसवेलने फक्त 57 चेंडूत शतक करताना 10 चौकार आणि 6 षटकार मारले. न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान शतक करणारा तो तिसरा फलंदाज बनला. ब्रेसवेलने अखेरपर्यंत एकट्याने झुंज देत 78 चेंडूत 140 धावा केल्या. यात त्याने 12 चौकार आणि 10 षटकार मारले. शार्दुल ठाकुरने दुसऱ्या चेंडूवर त्याला पायचित करत भारताच्या विजयातला मोठा अडसर दूर केला.

शार्दुलने न्यूझीलंडला दिला होता धक्का

शार्दुल ठाकुरने सामन्यात दोन गडी बाद केले. न्यूझीलंडला पहिला धक्का मोहम्मद सिराजने दिला होता. डेवॉन कॉनवेला त्याने बाद केलं होतं. त्यानतंर फिन अॅलन आणि हेन्री निकोलस यांनी डाव सावरत संघाची धावसंख्या 70 वर नेली होती. मात्र शार्दुल ठाकुरने फिन अॅलनला झेल देण्यास भाग पाडलं आणि न्यूझीलंडला दुसरा धक्का देत जोडी फोडली. त्यानंतर पुढच्या 60 षटकात न्यूझीलंडची पडझड झाली.

First published:

Tags: Cricket