वनडेत द्विशतक झळकावण्यात टीम इंडियाचा दबदबा, 13 वर्षांत 10 पैकी 7 भारतीयांच्या नावावर
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 10 द्विशतक झाली असून पहिल्यांदा हा पराक्रम सचिनने केला होता. तर आतापर्यंत सर्वाधिक 3 द्विशतके एकट्या रोहित शर्माच्या नावावर आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने द्विशतक झळकावलं. वनडेत आतापर्यंत दहा वेळा द्विशतक झालं असून यात सातवेळा भारतीय फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे.
2/ 11
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक केलं होतं. त्याने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेरमध्ये झालेल्या सामन्यात 147 चेंडूत नाबाद 200 धावा केल्या होत्या.
3/ 11
सचिननंतर असा पराक्रम भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने केला होता. त्याने 8 डिसेंबर 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 219 धावांची खेळी केली होती.
4/ 11
रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतलं तिसरं द्विशतक 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध केलं होतं. मोहालीत झालेल्या सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध 208 धावा केल्या होत्या.
5/ 11
भारताचा हिटमॅन रोहित शर्मा हा एकमेव असा फलंदाज आहे ज्याच्या नावावर वनडेमध्ये तीन द्विशतके आहेत. 2013 मध्ये पहिल्यांदा त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 158 चेंडूत 209 धावा केल्या होत्या.
6/ 11
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध द्विशतक केलं होतं. 2015 मध्ये त्याने 147 चेंडूत 215 धावा केल्या होत्या.
7/ 11
रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 2014 मध्ये इडन गार्डन्सवर वादळी द्विशतक झळकावलं होतं. त्या सामन्यात रोहित शर्माने 173 चेंडूत 264 धावा केल्या होत्या. वनडेतील ही एका फलंदाजाची डावातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
8/ 11
न्यूझीलंडचा माजी सलामीवीर मार्टिन गुप्टिलने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतक केलं होतं. एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये त्याने नाबाद 237 धावा केल्या होत्या.
9/ 11
पाकिस्तानचा फलंदाज फखर जमानने द्विशतक केलं होतं. त्याने 2018 मध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध नाबाद 210 धावा केल्या होत्या.
10/ 11
भारताचा युवा फलंदाज इशान किशनने बांगलादेशविरुद्ध डिसेंबर 2022 मध्ये द्विशतक केलं. त्याने 131 चेंडूत 210 धावा करताना सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम केला.
11/ 11
शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध 208 धावांची खेळी करताना द्विशतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 149 चेंडूत 208 धावा केल्या.