मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /MI vs PBKS : मुंबई इंडियन्सचा पंजाबवर विजय, हार्दिकची तडाखेबाजी खेळी

MI vs PBKS : मुंबई इंडियन्सचा पंजाबवर विजय, हार्दिकची तडाखेबाजी खेळी

अटीतटीच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स इलेव्हन (Punjab Kings) वर विजय मिळवला

अटीतटीच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स इलेव्हन (Punjab Kings) वर विजय मिळवला

अटीतटीच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स इलेव्हन (Punjab Kings) वर विजय मिळवला

दुबई, 28 सप्टेंबर : दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सीझनमध्ये लढती आता रंगत अवस्थेत आलेल्या आहे. सलग दोन वेळा पराभवाचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पदरी अखेर यश आले आहे. अटीतटीच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स इलेव्हन (Punjab Kings) वर विजय मिळवला आहे.

पंजाब किंग्स इलेव्हन विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला चांगलीच कसरत करावी लागली आहे. आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सला बदल करावे लागले होते. ईशान्स किशनला (Ishan Kishan) विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी सौरभ तिवारीला संधी देण्यात आली होती. सौरभने संधीचं सोनं करत ४५ रन्सची दमदार खेळी केली. यात त्याने २ सिक्स आणि ३ चौकार लगावले. तर क्विंटन डिकॉक २७ रन्सची खेळी केली.

आठव्यांदा प्रेग्नंट 6 मुलांची आई; लोक विचारतात 'एवढ्यांचं पालनपोषण कसं करणार'

परंतु, कॅप्टन रोहित शर्माने मात्र या सामन्यात निराशा केली. अवघे ८ रन्स करून तो माघारी परतला. त्यानंतर सुर्यकुमार यादवही फार काही कमाल करू शकला नाही, तोही माघारी परतला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि पोलार्डने दमदार खेळी करत विजयाचा मार्ग सोपा केला. हार्दिकने तडाखेबाज फलंदाजी करत 40 रन्स केले आणि टीमला विजय मिळवून दिला.

त्याआधी मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पंजाबला पहिली बॅटिंग करण्याची संधी दिली. पंजाबने १३५ धावांचे माफक आव्हान उभे केले. पण, टॉप ऑर्डर सपशेल फेल ठरली.  मनदीप सिंह 15 रन्स करून आउट झाला तर  क्रिस गेल फक्त 1 रन करून माघारी परतला. केएल राहुलने 21 रन्स केले आणि आउट झाला. निकोलस पूरन याही मॅचमध्ये खास अशी कामगिरी करू शकला नाही फक्त 2 रन्स करून तो माघारी परतला.

Savings अकाउंट चांगलं की Salary अकाउंट? वाचा कोणत्या अकाउंटमुळे होणार फायदा

त्यानंतर 29 चेंडूमध्ये 42 रन्स करून एडेन मार्करमने चांगली खेळी केली. तर दीपक हुड्डाने 28 रन्स करून टीमला साथ दिली. मुंबईकडून नाथन कूल्टर नाइलने 4 ओव्हरमध्ये फक्त 19 रन्स दिले पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. तर काइरन पोलार्डने 8 रन देऊन 2 विकेट मिळवल्या. जसप्रीत बुमराहनेही 2 विकेट मिळवल्या. क्रुणाल पांड्या आणि राहुल चाहरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाल्या

First published:
top videos

    Tags: IPL 2021