मराठी बातम्या /बातम्या /मनी /Savings अकाउंट चांगलं की Salary अकाउंट? वाचा नक्की काय कोणत्या अकाउंटमुळे होणार तुमच्या खिशाला फायदा

Savings अकाउंट चांगलं की Salary अकाउंट? वाचा नक्की काय कोणत्या अकाउंटमुळे होणार तुमच्या खिशाला फायदा

या दोन खात्यांमध्ये थोडा फरक (Difference between salary and savings account) असतो. जाणून घेऊया

या दोन खात्यांमध्ये थोडा फरक (Difference between salary and savings account) असतो. जाणून घेऊया

या दोन खात्यांमध्ये थोडा फरक (Difference between salary and savings account) असतो. जाणून घेऊया

    नवी दिल्ली, 28 सप्टेंबर :आजकाल बहुतांश सर्वांचं बँकेत एक तरी बचत खातं (Saving Account) असतं. त्याशिवाय जे नोकरी करतात त्यांचं वेतन (Salary) कंपनीतर्फे बँक खात्यात जमा केलं जातं. कोणतीही कंपनी किंवा संस्था शक्यतो एकाच बँकेत आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराचं खातं ठेवतात. त्यामुळे अलीकडच्या काळात नोकरदार व्यक्तींची किमान दोन बँक खाती असतात. एक वैयक्तिक बचत खातं आणि दुसरं वेतनासाठीचं बँक खातं. ही दोन्ही खाती बचत खातं प्रकारात येत असली तरी बँका (Banks) वेतन खात्याला काही सवलती देतात. त्यामुळे या दोन खात्यांमध्ये थोडा फरक (Difference between salary and savings account) असतो. जाणून घेऊ या यातला नेमका फरक काय आहे. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतची माहिती दिली आहे.

    वेतन खातं कर्मचाऱ्याला वेतन देण्याच्या हेतूनं उघडलं जातं. कोणत्याही कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या वैयक्तिक बचत खात्याव्यतिरिक्त कंपनी सांगेल त्या बँकेत वेगळं वेतन खातं उघडावं लागतं. जेव्हा कंपनी कर्मचाऱ्यांना पगार देते तेव्हा बँक कंपनीच्या खात्यातून पैसे घेते आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते. बचत खातं हे बँकेत पैसे ठेवण्यासाठी किंवा बचत करण्याच्या हेतूने उघडलं जातं.

    बचत खातं कोणत्याही व्यक्तीला उघडता येतं, तर कंपनीचं ज्या बँकेशी टायअप आहे, त्या बँकेत कर्मचारी कॉर्पोरेट वेतन खातं उघडू शकतात. एम्प्लॉयर कंपनीद्वारेही वेतन खातं उघडलं जाते. वेतन आणि बचत या दोन्ही खात्यांसाठी बँका समान व्याजदर (Same Interest rate) देतात.

    हे वाचा - Air India च्या खासगीकरणाची प्रक्रिया वेगात; 'या' दोन कंपन्यांमध्ये चुरस; लवकरच विजेत्या बोलीची होणार घोषणा

    बचत खात्यात किमान ठराविक रक्कम शिल्लक (Minimum Balance) असणं अनिवार्य असतं. वेतन खात्याला हा नियम लागू नाही. त्यात शून्य रक्कम शिल्लक (Zero balance) असली तरी चालते. किमान शिल्लक नसेल तर बचत खात्याला दंड (Penalty) लागू होतो, तसं वेतन खात्याबाबत होत नाही; मात्र ठराविक काळ तुमच्या वेतन खात्यात वेतन जमा झालं नाही, तर बँक या खात्याचं नियमित बचत खात्यात रूपांतर करते. साधारणपणे हा कालावधी तीन महिन्यांचा असतो.

    बँकेनं परवानगी दिल्यास तुम्ही तुमचं बचत खातं पगार खात्यात रूपांतरित करू शकता. नोकरी (Job) बदलली आणि तुमच्या नवीन कंपनी किंवा संस्थेनं त्या खात्याला मान्यता दिली तर त्याच खात्यात तुमच्या नवीन कंपनीकडून पगार जमा होऊ शकतो, अन्यथा तुम्हाला कंपनीने सांगितलेल्या बँकेत वेतन खातं उघडावं लागेल

    First published:
    top videos

      Tags: Saving bank account, बँक