भारत-पाक महामुकाबला! वर्ल्ड कपमधील पहिली सेमीफायनल आज रंगणार

भारत-पाक महामुकाबला! वर्ल्ड कपमधील पहिली सेमीफायनल आज रंगणार

भारताचा पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपची सेमीफायनल रंगणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी : भारताचा पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपची सेमीफायनल रंगणार आहे. भारताने प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला 74 धावांनी पराभूत करून अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. तर पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम चार जणांमध्ये स्थान पटकावलं आहे. अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिली लढत होणार आहे. दोन्ही संघांमध्ये मंगळवारी चार फेब्रुवारीला हा सामना होणार आहे. दुपारी दीडच्या सुमारास हा सामना सुरु होईल. यातील दुसरी सेमीफायनल गुरुवारी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात होईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 23 सामने झाले आहेत. यातील 14 भारताने तर 8 पाकिस्तानने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला होता. सध्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा यशस्वी जयस्वाल फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. तर गोलंदाजांमध्ये रवि बिश्नोई चौथ्या क्रमांकावर आहे.

वर्ल्ड कपमध्ये भारत पाक 9 वेळा आमने सामने आले आहेत. यात 4 वेळा पाकिस्तान तर 5 वेळा भारताने विजय मिळवला आहे. गेल्या तीन सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवलं आहे. पाकिस्तानच्या संघाने 23 जानेवारी 2010 मध्ये भारताला वर्ल्ड कपमध्ये पराभूत केलं होतं.

आतापर्यंत भारताने वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका, जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. तर पाकिस्तानने स्कॉटलंड, झिम्बॉम्बे, अफगाणिस्तान यांना पराभूत केलं आहे. तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्याचा निकाल लागला नाही.

भारतीय U19 टीम: यशस्वी जयस्वाल, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, प्रियम गर्ग, ध्रुव जुरेल, सिद्धेश वीर, अथर्व अंकोलेकर, रवि बिश्नोई, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, विद्याधर पाटील, शुभांग हेगडे, शाश्वत रावत, कुमार कुशाग्र

पाक‍िस्‍तान U19 टीम: हैदर अली, मोहम्मद हुरारा, रोहेल नजीर, फहद मुनीर, कासिम अकरम, मोहम्मद हैरिसव, इरफान खान, अब्बास अफरिदी, ताहिर हुसैन, आमिर अली, मोहम्मद आमिर खान, मोहम्मद वासिम ज्यूनिअर, अब्दुल बांगलजई, मोहम्मद शहजाद, आसिफ अली खान

एका मिनिटाला एवढे पैसे! ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या जोकोविचला मिळणारी रक्कम ऐकून थक्क व्हाल

 

First published: February 4, 2020, 7:55 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading