वडील 94 हजार कोटींचे मालक पण अवघ्या 30 लाखांसाठी IPL खेळत होता मुलगा

वडील 94 हजार कोटींचे मालक पण अवघ्या 30 लाखांसाठी IPL खेळत होता मुलगा

कोट्यावधींचा मालक असलेल्या खेळाडूला आयपीएलमधून मिळाला डच्चू.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : जगातील सर्वात महागडी लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. दरवर्षी आयपीएलच्या लिलावात कोट्यावधींची उलाढाल केली जाते. त्यामुळं आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सर्व युवा खेळाडू तयार असतात. त्याचबरोबर खेळाडूंना या स्पर्धेत दिग्गज खेळाडूंबरोबर खेळण्याची संधीही मिळते. मात्र आता तेराव्या हंगामाआधी खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे. आयपीएल 2020ची जय्यत तयारी सुरू असताना आठही संघांनी दिग्गजांना डच्चू दिला आहे.

आयपीएलमध्ये पैसे कमवण्यासाठी अनेक खेळाडू येतात, मात्र एक असा खेळाडू राजस्थान संघाकडून खेळत होता जो स्वत: कोट्यावधींचा मालक आहे. या खेळाडूला आता संघातून डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू आहे उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन बिर्ला. सद्यस्थितीला कुमारमंगलम बिर्ला हे 94 हजार कोटींचे मालक आहेत. कुमारमंगलम हे आदित्य बिर्ला कंपनीचे मालक आहेत. मात्र त्यांचा मुलगा आवड म्हणून क्रिकेट खेळतो.

वाचा-IPL लिलावाआधी बंगळुरू आणि मुंबई संघानं दिग्गजांना डच्चू, 19 खेळाडू संघाबाहेर

आयपीएलमध्ये 22 वर्षीय आर्यमननं राजस्थान संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. आर्यमानला 30 लाखांना विकत घेतले होते. आर्यमननं आपल्या क्रिकेटची सुरुवात मध्य प्रदेशमधून रणजी ट्रॉफी खेळण्यापासून केली. कुमारमंगलम बिर्ला हे सुध्दा क्रिकेटचे खुप मोठे चाहते असल्यामुळं त्यांनी नेहमीच आर्यमनला प्रोत्साहन दिले.

 

View this post on Instagram

 

Little by little, step by step 🏏 Doing what I love most #ZiddiDil

A post shared by Aryaman V Birla (@aryamanvb) on

एवढेच नाही तर, राजस्थान रॉयल्स संघात आर्यमनची निवड ही त्याच्या खेळामुळे झाली होती. मात्र आर्यमनला राजस्थान संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळं त्याल रिलीज करण्यात आले आहे. आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या लिलावात आर्यमनला कोणता संघ संधी देणार हे पाहावे लागणार आहे.

कोलकातानं 10 खेळाडूंना केले रिलीज

रॉबिन उथप्पा, क्रिस लीन, पियूष चावला, जो डेनली, कार्लोस ब्रेथवेट, पृथ्वीराज, निखिल नायक, करियप्पा, मॅथ्यू केली, एस मुंडे.

दिल्ली कॅपिटल्सने 5 खेळाडूंना केले रिलीज

क्रिस मॉरिस, कोलिन इनग्राम, हनुमा विहारी, कोलिन मुनरो, अंकुश बॅंस.

किंग्स इलेव्हन पंजाबने 4 खेळाडूंना केले रिलीज

डेव्हिड मिलर, एंड्रयू टे, सॅम कुरन, वरुण चक्रवर्ती.

वाचा-IPL 2020साठी मुंबई इंडियन्स सज्ज, रोहितला मिळणार 'या' चॅम्पियन खेळाडूची साथ!

रॉयल चॅलेंजर बंगळुरूने 12 खेळाडूंना केले रिलीज

डेल स्टेन, मार्कस स्टॉयनिस, शिमरोन हेटमायर, अक्शदीप, नाथन कुल्टर नाइल, कॉलिन डी ग्रॅंडहोम, प्रयास, टिम साउथी, कुलवंत खजरोलिया, एस सिंह, हेनरिक क्लासेन, मिलिंद.

मुंबई इंडियन्स संघाने 7 खेळाडूंना केले रिलीज

युवराज सिंग, इविन लेव्हिस, एडम मिलने, जेसन बेहरेनडॉर्फ, बरिंदर सरां, बेन कटिंग, पंकज जयस्वाल.

राजस्थान रॉयल्सने 11 खेळाडूंना केले रिलीज

जयदेव उनाडकट, राहुल त्रिपाठी, एस्टन टर्नर, ओशाने थॉमस, ईश सोढ़ी, आर्यमान बिर्ला, स्टुअर्ट बिन्नी, लियाम लिविंगस्टोन, सुदेशमान मिधुन, शुभम रंजाने, प्रशांत चोप्रा.

वाचा-धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनं घेतला मोठा निर्णय, या 3 स्टार खेळाडूंना दिला डच्चू

सनरायजर्स हैदराबादने 5 खेळाडूंना केले रिलीज

यूसुफ पठान, शाकिब-अल-हसन, मार्टिन गप्तिल, दीपक हुडा, रिकी भुई.

चेन्नई सुपर किंग्सने 5 खेळाडूंना केले रिलीज

सॅम बिलिंग्स, चैतन्य बिश्नोई, ध्रुव शॉरी, डेविड विले, मोहित शर्मा.

Published by: Priyanka Gawde
First published: November 16, 2019, 8:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading