मुंबई, 15 नोव्हेंबर : आयपीएल 2020च्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आयपीएलच्या 13व्या हंगामाकरिता डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे. याआधी आज आठही संघांनी आपआपल्या संघातील नको असलेल्या खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे. रिलीज करण्यात आलेल्या खेळाडूंचे भवितव्य हे आता लिलावात ठरणार आहे. एवढेच नाही तर कोलकाता संघाने रॉबिन उथप्पाला रिलीज करण्यात आले आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सनं हनुमा विहारी आणि क्रिस मॉरिस यांना संघाबाहेर केले आहे. पंजाब संघानं सॅम कुरन, डेव्हिड मिलर यांना डच्चू दिला आहे. या संघांनी दिग्गज खेळाडूंना डच्चू दिला आहे.
वाचा- ‘संकटमोचक’ मुंबईकरालाच रोहितनं दिला डच्चू, 4 वर्षात फक्त एकदा दिली संधी कोलकातानं 10 खेळाडूंना केले रिलीज रॉबिन उथप्पा, क्रिस लीन, पियूष चावला, जो डेनली, कार्लोस ब्रेथवेट, पृथ्वीराज, निखिल नायक, करियप्पा, मॅथ्यू केली, एस मुंडे. दिल्ली कॅपिटल्सने 5 खेळाडूंना केले रिलीज क्रिस मॉरिस, कोलिन इनग्राम, हनुमा विहारी, कोलिन मुनरो, अंकुश बॅंस. किंग्स इलेव्हन पंजाबने 4 खेळाडूंना केले रिलीज डेव्हिड मिलर, एंड्रयू टे, सॅम कुरन, वरुण चक्रवर्ती. वाचा- IPL 2020साठी मुंबई इंडियन्स सज्ज, रोहितला मिळणार ‘या’ चॅम्पियन खेळाडूची साथ! रॉयल चॅलेंजर बंगळुरूने 12 खेळाडूंना केले रिलीज डेल स्टेन, मार्कस स्टॉयनिस, शिमरोन हेटमायर, अक्शदीप, नाथन कुल्टर नाइल, कॉलिन डी ग्रॅंडहोम, प्रयास, टिम साउथी, कुलवंत खजरोलिया, एस सिंह, हेनरिक क्लासेन, मिलिंद. मुंबई इंडियन्स संघाने 7 खेळाडूंना केले रिलीज युवराज सिंग, इविन लेव्हिस, एडम मिलने, जेसन बेहरेनडॉर्फ, बरिंदर सरां, बेन कटिंग, पंकज जयस्वाल. राजस्थान रॉयल्सने 11 खेळाडूंना केले रिलीज जयदेव उनाडकट, राहुल त्रिपाठी, एस्टन टर्नर, ओशाने थॉमस, ईश सोढ़ी, आर्यमान बिर्ला, स्टुअर्ट बिन्नी, लियाम लिविंगस्टोन, सुदेशमान मिधुन, शुभम रंजाने, प्रशांत चोप्रा. वाचा- धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनं घेतला मोठा निर्णय, या 3 स्टार खेळाडूंना दिला डच्चू सनरायजर्स हैदराबादने 5 खेळाडूंना केले रिलीज यूसुफ पठान, शाकिब-अल-हसन, मार्टिन गप्तिल, दीपक हुडा, रिकी भुई. चेन्नई सुपर किंग्सने 5 खेळाडूंना केले रिलीज सॅम बिलिंग्स, चैतन्य बिश्नोई, ध्रुव शॉरी, डेविड विले, मोहित शर्मा.

)







