IPL 2020साठी मुंबई इंडियन्स सज्ज, रोहितला मिळणार 'या' चॅम्पियन खेळाडूची साथ!

IPL 2020साठी मुंबई इंडियन्स सज्ज, रोहितला मिळणार 'या' चॅम्पियन खेळाडूची साथ!

आयपीएलच्या तेराव्या हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. हंगाम सुरू होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना डिसेंबरमध्ये IPL 2020साठी लिलाव होणार आहे. दरम्यान त्याआधी आयपीएलच्या लिलावासाठी ऑफ सीझन ट्रेड विंडो ही 14 नोव्हेंबरपर्यंत खुली राहणार आहे. त्यामुळं कोणत्या खेळाडूंना ठेवणार किंवा रिलीज करता येणार यासाठी एका दिवसाचा कालावधी उरला आहे.

दरम्यान, आयपीएलमधला (IPL) चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सनं पुढच्या हंगामासाठी जोरात तयारी केली आहे. मुंबई इंडियन्सनं न्यूझीलंड संघाचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टला आपल्या संघात सामिल केले आहे. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या बोल्टला रिलीज केल्यानंतर मुंबईनं संघात घेतले. त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या अंकित राजपूतला राजस्थान संघाकडे सोपवण्यात आले आहे. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघानं 2.2 कोटींना बोल्टला विकत घेतले होते.

वाचा-धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनं घेतला मोठा निर्णय, या 3 स्टार खेळाडूंना दिला डच्चू

आयपीएलच्या लिलावात संघाकडे आहेत इतके पैसे

दिल्ली कॅपिटल्स – 7.7 कोटी

राजस्थान रॉयल्स – 7.15 कोटी रुपये

कोलकाता नाइट राइडर्स – 6.05 कोटी रुपये

सनराइजर्स हैदराबाद – 5.30 कोटी रुपये

किंग्स इलेवन पंजाब – 3.7 कोटी रुपये

मुंबई इंडियन्स – 3.55 कोटी रुपये

चेन्नई सुपर किंग्स – 3.2 कोटी रुपये

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 1.80 कोटी रुपये

वाचा-बॅट, पॅड, पॅड आणि स्टम्प! पाहा क्रिकेटमधल्या अफलातून चेंडूचा VIDEO

सर्वाधिक विजेतेपद मुंबईकडे

आयपीएलमध्ये यावर्षी चेन्नईचा पराभव करून मुंबईने विजेतपद मिळवले. आयपीएलच्या 12 हंगामात मुंबईने सर्वाधिक 4 विजेतेपद मिळवले आहेत. तर धोनीच्या संघाने 3 वेळा विजेतेपद मिळवले आहे. कोलकाता संघाने दोन वेळा तर हैदराबाद डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स यांनी प्रत्येकी एक वेळा विजेतेपद मिळवले आहे. यंदाचा आयपीएलचा अंतिम सामना 18.6 मिलियन लोकांनी पाहिला होता. तर जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात 20 टक्क्यांनी फायदा झाला आहे.

वाचा-'ती' हॅट्रिक नव्हतीच, BCCI आणि ICCनं केली माती!

ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्येही मुंबई टॉपवर

आयपीएलच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूएशन रिपोर्टनुसार मुकोश अंबानी यांच्या मालकीचा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ सर्वात वरच्या स्थानावर आहे. या संघाची ब्रॅण्ड व्हॅल्यू 809 कोटी इतकी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 8.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सलग चौथ्या वर्षी मुंबईचा संघ अव्वल स्थानी राहिला आहे. ब्रॅण्ड व्हॅल्यूबाबत चेन्नई सुपरकिंग्ज(Chennai Superkings)ला सर्वात अधिक फायदा झाला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूत यंदा 13.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चेन्नईची ब्राँड व्हॅल्यू आता 732 कोटी इतकी झाली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 13, 2019, 8:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading