मुंबई, 25 मे : आयपीएल 2023 मध्ये एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ विरुद्ध दणदणीत विजय मिळवला. मुंबईने लखनऊला 81 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात मुंबईने दिलेलं 183 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लखनऊची एक वेळ अवस्था 2 बाद 69 अशी होती. पण त्यानंतर त्यांच्या पाच विकेट अवघ्या 23 धावात गमावल्या. मार्कस स्टोइनिस वगळता इतर एकही खेळाडू मैदानावर टिकू शकला नाही. मोक्याच्या क्षणी तीन फलंदाज समन्वयाच्या अभावामुळे धावबाद झाले.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांच्या फटकेबाजीच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 182 धावा केल्या. तिलक वर्मा आणि निहाल वढेरा यांनीही अखेरच्या षटकात उपयुक्त खेळी केली.
IPL 2023 : इंजिनिअर मढवालची रेकॉर्डब्रेक कामगिरी, भले भले बॉलरही जवळपास नाहीत!
सामन्यानंतर बोलताना लखनऊचा कर्णधार कृणाल पांड्याने स्वत:ची चूक असल्याचं म्हटलं आहे. तो म्हणाला की, आम्ही चांगल्या स्थितीत होतो. मी चुकीचा फटका खेळल्यानंतर सगळी पडझड सुरू झाली. मी तो शॉट खेळायला नको होता. सर्व दोष मी माझ्यावर घेतो.
खेळपट्टीची काहीच अडचण नव्हती. फक्त आमचा संघ चांगली फलंदाजी करू शकला नाही. दोन्ही डावात खेळपट्टी सारखीच होती. आम्हाला चांगली फलंदाजी करायची होती असंही कृणाल पांड्या म्हणाला. क्विंटन डी कॉकला न खेळवण्याबद्दल विचारले असता कृणाल पांड्याने सांगितलं की, इथं डीकॉकच्या तुलनेत या मैदानावर काइल मायर्सचं रेकॉर्ड चांगलं होतं. त्यामुळे काइल मायर्सला घेऊन खेळता येईल असं आम्हाला वाटलं.
Also Read : महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या निकालाचे सर्व लेटेस्ट अपडेट इथे पाहा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.